Sherlyn Chopra Video: शर्लिन उर्फीच्या एक पाउल पुढं! व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी काढले फॅशनचे धिंडवडे.....

Sherlyn Chopra Video
Sherlyn Chopra VideoEsakal

Sherlyn Chopra Video: अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ही नेहमी ट्रोल होत असते. ती असं काही तरी करते की नेटकरी तिच्यावर टिका करत असतात. काही दिवसांपुर्वीच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ती फ्रंट आणि साइड कट ड्रेस मध्ये दिसली होती.

शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले आणि तिची उर्फी जावेदशी तुलना केली. ट्रोल झाल्यानंतरही शर्लिनवर त्याचा काही फरक पडला नसल्याच दिसलं. तिनं पुन्हा तिची फॅशन दाखवली आहे आणि आता तर कहरच केला आहे.

शर्लिनचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्राने आणखीनच बोल्डनेस दाखवली आहे. शर्लिन चोप्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी जहरी टीका केली आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा एका व्यक्तीसोबत दिसत आहे. शर्लिन चोप्राने लेगिंग्जसह अनोख्या स्टाईलची सिल्वर रंगाची ब्रा घातली आहे आणि त्यावर जॅकेट आहे. अशा प्रकारे शर्लिन चोप्राने तिची कर्वी फिगर जबरदस्त फ्लॉन्ट केली.

शर्लिन चोप्रा तिच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीला बोलते की तिला गरम होत आहे आणि जेव्हा तिला गरम होत तेव्हा ती तिचे जॅकेट काढते. यानंतर दोघेही हसायला लागतात. शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि बहुतेक लोक तिला ट्रोल करत आहेत.

यावेळी तिचा तुलना उर्फी जावेदशी करण्यात येत आहे. इतकच नाही तर नेटकरी उर्फी हिच्यापेक्षा बरी असल्याच म्हणत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्फीबद्दलचा आदर वाढल्याचं देखाल काही ट्रोलर्सचे म्हणणे आहे.

एका युजरने लिहिले आहे की, 'निर्लज्जपणाची परिसीमा गाठली, शेजारच्या मुलालाही लाज वाटली.' तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'उर्फीला जावेदची जागा घ्यायची आहे का?'

अशा प्रकारे सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शर्लिन चोप्राचा क्लास सुरू केला आहे. शर्लिन चोप्राच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 'टाइमपास', 'रेड स्वस्तिक', 'गेम', 'कामसूत्र' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असून तिने साजिद खानवर मी2 चे आरोप केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com