शर्लिन चोप्राचे ड्रग्स कनेक्शनबाबत मोठे खुलासे, बॉलीवूड आणि क्रिकेटर्सच्या पत्नींवर केले आरोप

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 24 September 2020

शर्लिनने दावा केला आहे की मोठे क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नी ड्रग्स घेतात. शर्लिनने असं देखील म्हटलं आहे की केकेआरच्या मॅचनंतरच्या पार्टीमध्ये क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नींना बाथरुममध्ये ड्रग्स घेताना पाहिलं आहे.   

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शनबाबत मोठे खुलासे केले आहेत. शर्लिनने दावा केला आहे की मोठे क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नी ड्रग्स घेतात. शर्लिनने असं देखील म्हटलं आहे की केकेआरच्या मॅचनंतरच्या पार्टीमध्ये क्रिकेटर्स आणि सुपरस्टार्स यांच्या पत्नींना बाथरुममध्ये ड्रग्स घेताना पाहिलं आहे.   

हे ही वाचा: बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रींसोबत ड्रग प्रकरणात नाव आलेली कोण आहे सिमोन खंबाटा?   

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शर्लिनने म्हटलंय की, 'या आफ्टरमॅच पार्टीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमचे क्रिकेटर्स, त्यांच्या पत्नी, कर्मचारी आणि टीमचे मालक होते तसंच त्यांच्यासोबत त्यांचे काही आवडते सुपरस्टार मित्र देखील होते. मी तिथे जेव्हा बाथरुममध्ये गेली तेव्हा त्यांच्या पत्नींना व्हाईट पावडर स्मोक करताना मी पाहिलं. जर मी पुरुषांच्या बाथरुममध्ये गेले असते तर तिथे भलताच नजारा पाहायला मिळाला असता.'

शर्लिन ज्या कोलकाता नाईट रायडर टीम विषयी बोलतेय ती आयपीएलची कोलकाता फ्रँचायजी आहे आणि या फ्रँचायजीचा मालक बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आहे. 

शर्लिन चोप्रा म्हणाली, 'ही गोष्ट बाहेरच्या लोकांसाठी आश्चर्यकारक असेल मात्र बॉलीवूडच्या लोकांना चांगल्या प्रकारे माहित आहे की कोण कोण कोकिन ऍडीक्ट आहेत, कोण हे ड्रग्स घेतल्याशिवाय कामंच करु शकत नाहीत ते. मी पार्टीमध्ये कोणाकोणाला पाहिलं हे माझ्या चांगलं लक्षात आहे. वेळ आल्यावर सगळं सांगेन. हे लपवण्याचा माझा कोणता उद्देश नाहीये. माझी इच्छा आहे की या ड्रग्स सिंडिकेट पूर्णपणे खुलासा व्हावा. सगळ्या सप्लायर्स आणि डिलर्सची नावं बाहेर आली पाहिजेत. त्यानंतर हिंदी सिनेइंडस्ट्री स्वच्छ होईल.'

'स्टार पत्नींबाबत बोलायचं झालं तर ज्या स्टार पत्नींविषयी आपण वाचतो की त्यांच्या बॅगची किंमत, शूजची किंमत एवढी आहे, आता आपल्या लोकांना हे देखील माहिती असलं पाहिजे की हे लोक कोणता माल घेतात.'

यासोबतंच शर्लिनने क्वान कंपनीबाबत बातचीत केली. ती म्हणाली, 'क्वानचा जो मालक आहे तो एक नंबरचा घाणेरडा माणूस आहे. मला त्याला भेटल्यावर कळालं की तो किती नीच आहे. तो मला वर पासून खालपर्यंत न्याहाळत होता तेव्हा मी त्याला विचारलं की काय झालं मी काही फाटलेलं घालून आली आहे का? का कोणता डाग लागला आहे? यावर त्याने मला विचारलं की तुझ्या या ब्रेस्ट(छाती) ख-या आहेत का? एक घाणेरडा माणूसंच अशा गोष्टी करु शकतो ना.'

सुशांत प्रकरणात होत असलेल्या ड्रग्सच्या खुलास्यांवर शर्लिन म्हणाली, 'सुशांतच्या मृत्युनंतर कंगनाने पहिल्यांदा ही गोष्ट समोर आणली होती की सुशांतच्या मारेक-यांचा इंडस्ट्रीच्या ड्रग्स प्रकरणासोबत जवळचा संबंध आहे.' जेव्हा या मुलाखतीत शर्लिनला तु कधी ड्रग्स घेतले नाहीत का? असं विचारल्यावर तिने याचं उत्तर देणं टाळलं. ती म्हणाली, 'मी हे सगळं पाहून शॉक झाली की बाथरुममध्ये हे सगळं काय सुरु आहे.'  

sherlyn chopra revealed kkr owner cricketers and bollywood drugs connection  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sherlyn chopra revealed kkr owner cricketers and bollywood drugs connection