esakal | बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रींसोबत ड्रग प्रकरणात चर्चेत असलेली कोण आहे सिमोन खंबाटा?
sakal

बोलून बातमी शोधा

simone khambatta

स्टार अभिनेत्रींसोबत आणखी एक नाव सतत समोर येतंय ते म्हणजे सिमोन खंबाटा. कोण आहे ही सिमोन खंबाटा आणि बॉलीवूडच्या कोणाकोणाशी आहेत सिमोनचे संबंध? वाचा

बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रींसोबत ड्रग प्रकरणात चर्चेत असलेली कोण आहे सिमोन खंबाटा?

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड ड्रग प्रकरणात स्टार अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यांना या प्रकरणी समन्स देखील बजावण्यात आले आहेत. मात्र या स्टार अभिनेत्रींसोबत आणखी एक नाव सतत समोर येतंय ते म्हणजे सिमोन खंबाटा. कोण आहे ही सिमोन खंबाटा आणि बॉलीवूडच्या कोणाकोणाशी आहेत सिमोनचे संबंध? वाचा

हे ही वाचा: पूनम पांडे लग्नाच्या १३ दिवसांतच घेणार पती सॅम बॉम्बेसोबत घटस्फोट, म्हणाली 'सॅमने माझा गळा दाबला आणि..'    

व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेली सिमोन खंबाटा ही रणवीर सिंगची जुनी मैत्रिण आहे. ती अकरा वर्षांची असल्यापासुन त्यांच्यात मैत्री आहे. तसंच तिची आणि रियाची देखील चांगली मैत्री आहे. सिम्पली सिमोन या कपड्यांच्या नावाजलेल्या ब्रँण्डची ती क्रिएटीव्ह डिरेक्टर आहे. आता ती ड्रग्ज घेतल्या प्रकरणी चर्चेत आली आहे. याबरोबरच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती हे पार्टी मध्ये असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. सध्या बॉलीवुडमधील वेगवेगळया अभिनेत्रींची नावे ड्रग्ज कनेक्शन मध्ये समोर आली आहे. आता तिला एनसीबीकडुन चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आल्याने ती चौकशीसाठी हजर झाली आहे.

सधन कुटुंबात जन्माला आलेल्या सिमोनचा जन्म १७ फेब्रुवारी १९९१ साली दुबईत झाला आहे. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही दुबईत झाले. तिने न्युयॉर्कमधील पार्सन्स स्कुल ऑफ डिझाईन मधुन बॅचलर ऑफ फाईन आर्टस इन फॅशन डिझाईनची पदवी घेतली आहे. सोशल मीडियावर सिमोन सतत ऍक्टिव्ह असल्याचे दिसुन आले आहे.

तिचे स्वत:चे युट्युब चॅनेल असुन त्याचे ४ लाख ४२ हजार सबस्क्राईबर आहेत. पाल्य, पालक, यांना मार्गदर्शन करणे, मातृत्वाचे धडे देणे, नवजात बालकांचे संगोपन कसे करावे? याशिवाय आरोग्य, लाईफस्टाईल, आहार याचे तज्ज्ञांकडुन मार्गदर्शन या चॅनेलवरुन करण्यात येते. इन्स्टाग्रामवरही सिमोनला ४० हजाराहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

आता ड्रग्ज कनेक्शनमध्ये दिपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह यांच्यासह अनेकांची नावे समोर आली आहेत. सिमोन खंबाटाही थोड्याचवेळापूर्वी एनसीबीच्या चौकशीसाठी हजर झाली आहे.  

who is simone khambatta named by rhea chakraborty in drug links