esakal | कोरिओग्राफर शामक दावरला मातृशोक
sakal

बोलून बातमी शोधा

कोरिओग्राफर शामक दावरला मातृशोक

कोरिओग्राफर शामक दावरला मातृशोक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरची (shaimak davar) आई पुरन दावर (pooran davar) यांचे निधन झाले आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. वाढतं वय आणि आजारपण य़ामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या निधनानं शामकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्याला आधार दिला आहे. त्याच्या मातोश्रींना श्रद्धांजलीही वाहिली आहे. बॉलीवू़डमध्ये आपल्या कोरिओग्राफीसाठी प्रख्यात असणाऱ्या शामकचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यानं बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. आई ही त्याच्यासाठी मोठी प्रेरणास्त्रोत होती. गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून असणाऱ्या पुरन डावर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. अखेर त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली आहे.

बॉलीवूडमध्ये डान्स क्षेत्रात जो मोठा बदल झाला त्यात शामक दावरचं योगदान मोठं आहे. त्याला दिल तो पागल है चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ कोरिओग्राफीचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता. केवळ बॉलीवूडच नाहीतर त्यानं हॉलीवूडमध्ये देखील आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. त्यानं कोरिओग्राफी केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. ज्यावेळी बॉलीवू़डमध्ये सरोज खान, फराह खान, गणेश आचार्य यासारख्या मोठमोठ्या कोरिओग्राफर्सचा बोलबाला होता त्यावेळी शामक दावरनं आपल्या नावाचा ब्रँड तयार केला होता.

शामकनं हॉलीवूडमधील ब्रायन अॅडम्स, ओप्रा विन्फ्रे, टॉम क्रुझ, रिचर्ड गियर आणि स्टीव्ह वाँडर सारख्या सेलिब्रेटींसोबत काम केले आहे. हॉलीवूडमध्येही आपल्या कोरिओग्राफीसाठी त्याचं मोठं नाव आहे.s

हेही वाचा: 'त्या'अभिनेत्यांबरोबर काम नकोच, करिनाची मोठी यादी

loading image
go to top