esakal | 'राजच्या पीएनं दिली पॉर्न फिल्ममध्ये काम करण्याची ऑफर' अभिनेत्रीचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

'राजच्या पीएनं दिली पॉर्न फिल्ममध्ये काम करण्याची ऑफर' अभिनेत्रीचा खुलासा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सध्या राज कुंद्रा (raj kundra) हा पोलिस कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होताना दिसत आहेत. काल अभिनेत्री आणि मॉडेल पुनम पांडे (poonam pandey) आणि शर्लिन चोप्रा (sherlin chopra) यांनी राज आपल्याला पोर्न फिल्ममध्ये (porn film) काम करण्यासाठी पैसे देत होता असा आरोप केला होता. यानंतर आणखी एक अभिनेत्री आणि मॉडेलनं त्याच्यावर अशाच प्रकारचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यात तिनं राजच्या पीएकडून पोर्न फिल्ममध्ये काम करण्याची ऑफर आली होती. असं म्हटलं आहे. (Raj Kundra Porn Film Case Sagarika Shona Suman Shilpa Shettty yst88)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. जेव्हापासून त्याला अटक झाली आहे त्या दरम्यान अनेक अभिनेत्री मॉडेल यांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका शोना सुमनचा धक्कादायक आरोप आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो आरोप तिनं राजच्या पीएवर केला आहे. त्यामुळे राजची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दुसरीकडे पोलिसांनी आपल्याकडे राजच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचे सांगितले आहे.

राजचा पीए उमेश कामतनं आपल्याला पोर्न फिल्ममध्ये काम करण्यासाठी विचारणा केली होती. असं सागरिकानं म्हटलं आहे. त्यानं आपल्याशी संपर्कही साधला होता. मात्र आपण ही ऑफर नाकारली होती. असंही सागरिकानं सांगितलं आहे. सागरिकानं काही माध्यमांशी बातचीत केली. ती म्हणाली, लॉकडाऊनच्या वेळी आपण उमेशच्या संपर्कात आलो होतो. त्यानं माझा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून इंटव्ह्युही घेतला होता. मला ऑडिशनसाठीही विचारणा केली होती.

हेही वाचा: 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत निशिगंधा वाड साकारणार जिजामाता

हेही वाचा: साई पल्लवी ते समंथा; मेकअपशिवायही सुंदर दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री

आपण जेव्हा राजचे ते बोलणे ऐकले तेव्हा धक्काच बसला. मी त्याचे हे प्रपोजल नाकारले होते. त्यावेळी आणखी एक व्यक्ती त्या कॉलवर अॅड होता. मात्र त्यानं आपला चेहरा झाकून घेतला होता. ही ऑफर स्वीकारल्यास तुला कसलीच काळजी करण्याचे कारण नाही. असेही उमेशनं आपल्याला सांगितल्याचा खुलासा सागरिकानं यावेळी केला.

loading image