"चांगल्या-वाईट काळात.."; लग्नाच्या वाढदिवशी शिल्पाची खास पोस्ट | Shilpa Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty and Raj Kundra

"चांगल्या-वाईट काळात.."; लग्नाच्या वाढदिवशी शिल्पाची खास पोस्ट

लग्नाच्या १२व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री शिल्पा शेट्टीने Shilpa Shetty सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे. शिल्पाने तिच्या लग्नसोहळ्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत पती राज कुंद्राला Raj Kundra शुभेच्छा दिल्या आहेत. 'या क्षणी आणि १२ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते आजही पूर्ण करतोय. एकमेकांना चांगल्या गोष्टी सांगत, कठीण काळात एकमेकांची साथ देत, प्रेमावर विश्वास ठेवत आपण हे वचन पूर्ण करतोय. या मार्गावर देवाने आपली खूप मदत केली', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

शिल्पा शेट्टीची पोस्ट-

'या क्षणी आणि १२ वर्षांपूर्वी आपण एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते आजही पूर्ण करतोय. एकमेकांना चांगल्या गोष्टी सांगत, कठीण काळात एकमेकांची साथ देत, प्रेमावर विश्वास ठेवत आपण हे वचन पूर्ण करतोय. या मार्गावर देवाने आपली खूप मदत केली. १२ वर्षे आणि आणखी किती ते मी मोजू नाही शकत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..कुकी! आपल्या आयुष्यात आनंद, यश भरभरून येऊ दे. आपली बहुमोल संपत्ती म्हणजेच आपल्या मुलांनीही आनंद द्विगुणीत केला. आमच्या चांगल्या आणि वाईट काळात साथ देणाऱ्या सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार', अशा शब्दांत शिल्पाने तिच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

शिल्पा आणि राज यांना १० वर्षांचा मुलगा वियान आणि एक वर्षाची मुलगी समिषा आहे. समिषाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. १९ जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांनंतर मुंबई न्यायालयाने राजला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यापासून राज सोशल मीडियापासून दूर आहे. त्याने त्याचे अकाऊंट्ससुद्धा डिलीट केले आहेत. राजच्या अटकेनंतर शिल्पानेही काही काळ कामापासून आणि सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.

loading image
go to top