Shilpa Shetty Praised PM Modi: शिल्पा शेट्टीने PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाली, '500 वर्षांचा इतिहास तुम्ही...'

Shilpa Shetty Praised PM Modi: शिल्पा शेट्टीने 'पंतप्रधानांनी गेल्या ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे', म्हणत राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं आहे.
Shilpa Shetty Praised PM Modi
Shilpa Shetty Praised PM ModiEsakal

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. तिने पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी भारतातील कोट्यवधी लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा उत्साह व्यक्त केला आहे. यासोबतच शिल्पा शेट्टीने पत्रात लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे'.

शिल्पा शेट्टीचे पत्र भारतीय जनता पक्षाच्या (महाराष्ट्र) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर पोस्ट करण्यात आले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने अयोध्या राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले आहेत. शिल्पा शेट्टीने लिहिले, 'आदरणीय मोदीजी, काही लोक इतिहास वाचतात. काही लोक इतिहासातून शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात'.

Shilpa Shetty Praised PM Modi
kiran mane: "ते एक ड्रेनेज झालं आहे"; किरण मानेंचा नेमका टोला कोणाला?

तुम्ही 500 वर्षांचा इतिहास बदलला

तिने पुढे लिहिले की, 'तुम्ही रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास बदलला आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्या या शुभ कार्याने तुमचे नाव भगवान श्रीरामाच्या नावाशी कायमचे जोडले गेले आहे. नमो राम! जय श्री राम!'

22 जानेवारीला पार पडला अयोध्येत राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा

गेल्या महिन्यात, 22 जानेवारी रोजी, अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व स्तरातील दिग्गजांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर या धार्मिक सोहळ्यात बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतातील अनेक स्टार्सही सहभागी झाले होते.

Shilpa Shetty Praised PM Modi
Shah Rukh Khan on Qatar : शाहरुख खानमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? भाजप नेत्याचा दावा! जाणून घ्या सत्य

हे बॉलिवूड स्टार्स रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात झाले होते सहभागी

अरुण गोविल, सुनील लाहिरी, दीपिका चिखलिया, अमिताभ बच्चन, रजनीकांत, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, हेमा मालिनी, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित नेने, राजकुमार हिरानी, ​​कैलाश खेर, राम चरण, मनोज जोशी आणि इतर अनेक स्टार्स आले होते.

याशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्सना निमंत्रण पाठवण्यात आले होते, मात्र काही कारणास्तव ते प्राण प्रतिष्ठाला उपस्थित राहू शकले नाहीत. या यादीत रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि इतर स्टार्सचा समावेश आहे.

Shilpa Shetty Praised PM Modi
Rohit Sharma : सचिन नंतर आता 'हिटमॅन'ही झाला '१२ वी फेल'च्या 'विक्रांत'चा फॅन, म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com