esakal | शिल्पा शिंदेचे खुलं आव्हान; पाकिस्तानात करणार परफॉर्म! 
sakal

बोलून बातमी शोधा

शिल्पा शिंदेचे खुलं आव्हान; पाकिस्तानात करणार परफॉर्म! 

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असल्याचे म्हटले आहे. ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असून, कोण अडवतो बघूच, असे खुले आव्हान तिने दिले आहे.

शिल्पा शिंदेचे खुलं आव्हान; पाकिस्तानात करणार परफॉर्म! 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असल्याचे म्हटले आहे. ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असून, कोण अडवतो बघूच, असे खुले आव्हान तिने दिले आहे.

सिंगर मीका सिंगने पाकिस्तानमध्ये परफॉर्म केल्यानंतर भारतात त्याच्यावर बंदी लादली गेली. काभारत-पाकमधील तणावपूर्ण वातावरणात मीका पाकिस्तानाता जाऊन गातोच कसा? असा सवाल करत सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन  आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉई यांनी त्याच्यावर बंदी घातली होती, पुढे मीकाने संपूर्ण देशाची माफी मागितल्यावर ही बंदी उठवण्यात आली.

त्यानंतर शिल्पा अगदी उघडपणे मीका सिंगचे समर्थन करत खुले आव्हान दिले आहे. एक कलाकार म्हणून त्या ठिकाणी परफॉर्म करणे हा माझा हक्क आहे. माझा हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.

loading image
go to top