भन्सालीं विरोधात अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा'; म्हणाली,'वॉशरुममध्ये...' Sanjay Leela Bhansali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiny doshi, a panday store actress on Sanjay leela bhansali's Sarswatichandra  Serial experience

भन्सालीं विरोधात अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा'; म्हणाली,'वॉशरुममध्ये...'

Shiny doshi about Sanjay Leela Bhansali: पंडया स्टोर अभिनेत्रीनं संजय लीला भन्साली(Sanjay Leela Bhansali) संदर्भात हैराण करणारा खुलासा केला आहे. शाइनी दोशीचं(Shiny Doshi) म्हणणं आहे की संजय लीला भन्सालींसोबत काम करणं तिला खूप कठीण गेलं. चला जाणून घेऊया अखेर अभिनेत्रीनं संजय लीला भन्सालींविरोधात एवढं मोठं विधान का केलं?(Shiny doshi, a panday store actress on Sanjay leela bhansali's Sarswatichandra Serial experience)

हेही वाचा: Shahrukh च्या 'पठाण' वर रिलीज आधीच बहिष्काराची मागणी; CM योगी कनेक्शन?

शाइनी दोशी आपल्या पंड्या स्टोर शो मुळे नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. नेहमीच तिच्याशी संबंधित काही ना काही बातमी समोर येतेच असते. यावेळी अभिनेत्रीनं संजय लीला भन्सालींसोबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. शाइनी दोशीने संजय लीला भन्सालींच्या सरस्वतीचंद्र मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेचं दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं होतं.

हेही वाचा: बॉक्स ऑफिसवर डळमळणाऱ्या लाल सिंग चड्ढाचं नाव जोडलं जातंय ऑस्करशी,जाणून घ्या

पण अभिनेत्रीसाठी मात्र भन्सालींसोबतचा प्रवास काही सोपा राहिला नाही. शाइनीनं एका मुलाखतीत याविषयी म्हटलं आहे,''मी २०१२ मध्ये सरस्वतीचंद्र मध्ये काम केलं होतं. मला तेव्हा काही जमायचं नाही फार. तेव्हा माझे दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. त्यावेळी खूपच लाजिरवाणं वाटायचं. मला विचित्र वाटायचं. मला तेव्हा वाटू लागलं होतं, मी चुकीच्या ठिकाणी तर आली नाही ना. मी त्यांचं ओरडणं मुकाटपणे ऐकायचे आणि मग वॉशरुम मध्ये जाऊन रडायचे. आणि त्यानंतर हिम्मत करुन स्वतःला समजवायचे आणि सेटवर पुन्हा परतायचे''.

हेही वाचा: आमिर-अक्षयच्या अडचणीत वाढ; थिएटर मालकांनीही घेतला मोठा निर्णय

संजय लीला भन्साली आपल्या सिनेमांवर भरपूर मेहनत घेतात हे त्यांचे सिनेमे पाहिल्यावर आपल्याला कळते. शाइनी म्हणाली, ''प्रत्येक सीनआधी मला भीती वाटायची. मला शूटिंगचं तांत्रिक ज्ञान नव्हतं. पण हा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. भन्साली सर माझ्या लूक टेस्टवेळी उपस्थित होते. त्यांनीच मला निवडलं होतं खरंतर. मला कितीतरी वेळा वाटलं शो सोडून द्यावा. मी भन्साली सरांचा ओरडा खाऊन इतकी वैतागले होते की प्रॉडक्शन हाऊसला मी शो सोडतेय असं देखील कळवलं होतं. पण काही सहकाऱ्यांनी समजावलं, माझ्यात विश्वास निर्माण केला आणि मग पुढचा प्रवास मी इथवर करू शकले''.

Web Title: Shiny Doshi A Panday Store Actress On Sanjay Leela Bhansalis Sarswatichandra Serial

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..