​शीतली परत येतेय... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. "आलटी-पालटी' यात शिवानी मुख्य भूमिका साकारणार आहे. यात ती एक ठग म्हणून दिसेल. 

"लागिरं झालं जी' या मालिकेने महिन्यापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची प्रेमकहाणी सर्वांनाच भावली. तसंच या दोन्हीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्‍यावर उचलून धरल्या. मालिका जरी संपली असली तरी या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. जर रसिक-प्रेक्षक त्यांच्या लाडक्‍या शीतलीला मिस करत असतील, तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण, शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. "आलटी-पालटी' यात शिवानी मुख्य भूमिका साकारणार आहे. यात ती एक ठग म्हणून दिसेल. 

याबाबत शिवानी म्हणाली, ""मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. चित्रीकरणाच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shital Bavker News Serial

टॅग्स