Shiv Thakare: शिव ठाकरेनं शाहिदला दिली जोरदार टक्कर! 'गंदी बात'वर केला फाडू डान्स... व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
shiv thakare
shiv thakareSakal

रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 संपला आहे, परंतु त्याचे स्पर्धक अजूनही चर्चेत आहेत. या शोनंतर अनेक स्पर्धकांचे नशीब बदलले आहे. स्पर्धकांना एकामागून एक अनेक प्रोजेक्ट मिळत आहेत. दरम्यान, या शोचा स्पर्धक शिव ठाकरे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमधला शिवचा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिव बॉलीवूडचं प्रसिद्ध गाणं 'गंदी बात..गंदी-गंदी बात'वर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे आहे.

shiv thakare
Urmila kothare: उर्मिला कानेटकर साकारणार मंजुळा सातारकर! 'या' मालिकेत होणार धमाकेदार एण्ट्री..

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिव काळ्या रंगाची पँट आणि हाफ कलर फुल शर्टमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने एका कमरेला लाल रंगाचे कापड बांधले आहे, ज्यामध्ये त्याचा लूक बराचसा टपोरीसारखा दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत एक सुंदर मुलगीही डान्स करताना दिसत आहे.

शिव ठाकरेचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत शिवचे कौतुक केले आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने शाहिदशी तुलना करत लिहिले की, 'शिवने शाहीदलाही डान्समध्ये मागे टाकले. शिवच्या या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com