Shivrayancha Chhava: 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज; दिग्पाल लांजेकरांचा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Shivrayancha Chhava: दिग्पाल लांजेकर यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Shivrayancha Chhava Trailer
Shivrayancha Chhava Trailer
Updated on

Shivrayancha Chhava Trailer Out: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचे फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्पाल लांजेकर यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार भूषण पाटील

'शिवरायांचा छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत भूषण पाटील दिसत आहे. "स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी भार मोठी असते राणीसरकार" हा डायलॉग देखील ट्रेलरमध्ये ऐकू येतो. मुघलांनी जनतेवर केलेला अत्याचार देखील 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

युट्यूबवर 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,"प्रत्येक डायलॉग जबरदस्त,दिग्पाल दादा नेहमीच एक लेव्हलवर राहता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,"ट्रेलर खूपच छान आहे आणि तांत्रिकदृष्ट्या पण चित्रपट खूपच छान दिसत आहे"

पाहा ट्रेलर:

'शिवरायांचा छावा' चित्रपटाची स्टार कास्ट

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, तृप्ती मधुकर तोरडमल, प्रसन्न केतकर,अभिजीत श्वेताचंद्र, विक्रम गायकवाड, भूषण शिवतारे, अमित देशमुख, अवधूत गांधी,रवी काळे,राहुल देव, ज्ञानेश वाडेकर, ईशा केसकर, नंदिनी कान्हेरे, समीर धर्माधिकारी, दिप्ती लेले, सौरभ कुशवाह,बिपिन सुर्वे,आशुतोष वाडेकर,दादा पासलकर, सागर संत,शरद सिंह,राम आवणा, रणजित रणदिवे, नीता टिपणीस दोंदे,अमित मेहता, सायली सांभारे अशी तगडी स्टार कास्ट 'शिवरायांचा छावा' या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com