शिल्पा शेट्टीचा चित्रपट ठरणार 'निकम्मा'? पहिल्या दिवशीच चाहते नाराज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shjilpa shettys nikamma movie box office collection day 1

शिल्पा शेट्टीचा चित्रपट ठरणार 'निकम्मा'? पहिल्या दिवशीच चाहते नाराज..

Nikamma Box Office Collection : गेली काही दिवस चर्चेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा निकम्मा चित्रपट शुक्रवार १७ जून रोजी प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाची जेवढी हवा करण्यात आली तेवढे मात्र यश मिळताना दिसले नाही. बॉक्स ऑफिस वर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमी कमाई करून निर्मात्यांची निराशा केली आहे. तर आशय आणि विषय याबाबतीत चाहते नाराज असल्याचे दिसत आहे. (shjilpa shettys nikamma movie box office collection day 1)

हेही वाचा: ..तर तुम्हाला चार लोकांसोबत.. 'या' अभिनेत्रीने सांगितला अत्यंत कटू अनुभव

बॉलिवूड अभिनेता अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) 'निकम्मा' (Nikamma) चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात कमी पडला, असे चित्र आता समोर आले आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी 1 कोटीचाही टप्पा पार करू शकलेला नाही.

‘निकम्मा’ या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पुन्हा चित्रपट विश्वात कमबॅक केले आहे. या चित्रपटचित्रपटात शिल्पा शेट्टीसह अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 2022 या वर्षातील हा सातवा चित्रपट आहे, ज्याने पहिल्या दिवशी 1 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 15 कोटी खर्च आला. तर प्रमोशनसाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा चित्रपट शुक्रवारी सुमारे 1250 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 51 लाख रुपयांची कमाई केली आहे. हे चित्रपटासाठी अत्यंत निराशाजनक आहे. शिल्पाने या चित्रपटात सुपरवुमनची भूमिका साकारली आहे. 'निकम्मा' हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

Web Title: Shjilpa Shettyss Nikamma Movie Box Office Collection Day 1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top