Shoaib Ibrahim - Dipika Kakar: चिंताजनक! शोएब- दीपीकाचं बाळ काचेच्या पेटीत

शोएबने फॅन्स आणि माध्यमांनाही नवजात बाळासाठी प्रार्थना करण्यास सांगितले
Shoaib Ibrahim says newborn son is in incubator, requests fans to pray, gives health update on Dipika Kakar
Shoaib Ibrahim says newborn son is in incubator, requests fans to pray, gives health update on Dipika Kakar SAKAL

Shoaib Ibrahim - Dipika Kakar News: अभिनेता शोएब इब्राहिमने आणि त्याची पत्नी दीपिका ककर यांनी अलीकडेच बाळाचे स्वागत केले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना शोएब म्हणाला की, डॉक्टरांनी बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवले आहे. शोएबने फॅन्स आणि माध्यमांनाही नवजात बाळासाठी प्रार्थना करण्यास सांगितले.

(Shoaib Ibrahim says newborn son is in incubator, requests fans to pray, gives health update on Dipika Kakar)

Shoaib Ibrahim says newborn son is in incubator, requests fans to pray, gives health update on Dipika Kakar
Neena Gupta: पतीच्या शारिरीक गरजा भागवणे हे मुलीचं कर्तव्य... नीना गुप्तांच्या विधानाने चर्चांना उधाण

इंस्टाग्रामवर एका पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शोएब म्हणाला, "आणखी एक गोष्ट तुम्हा सर्वांना माहित आहे की, देवाच्या कृपेने, मी आणि दीपिका आई बाबा झालो आहोत. आम्हाला मुलगा झाला आहे. सध्या मी अधिक तपशील सांगण्याच्या उपस्थितीत नाही."

शोएब पुढे म्हणाला..“तो प्री - मॅच्युर जन्माला आला आहे. त्यामुळे तो लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे." असं आवाहन शोएबने केलंय.

दीपिका आणि शोएबने नेहमीच त्यांच्या फॅन्स आणि हितचिंतकांसोबत एक मजबूत बंध कायम ठेवला आहे. दीपिका ककर हॉस्पिटलमध्ये बरे होत असल्याने, तिचे चाहते तिच्या तब्येतीबद्दल आणि बाळाच्या विकासाबद्दल पुढील अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.. सध्या दीपिका आणि त्यांचं बाळ लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com