esakal | तापसीच्या आईवडिलांना सतावतेय तिच्या लग्नाची चिंता; "कोणाशीही लग्न कर पण.."
sakal

बोलून बातमी शोधा

taapsee pannu

तापसीच्या आईवडिलांना सतावतेय तिच्या लग्नाची चिंता; "कोणाशीही लग्न कर पण.."

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दमदार अभिनयाने अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटांसोबतच तापसी तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसीने लग्नाविषयी तिच्या आईवडिलांचं काय मत असतं, याबद्दल सांगितलं. "तू कोणाशीही कर, पण लवकरात लवकर लग्न कर", असे आईवडील सतत सांगत असल्याचं तापसीने म्हटलं. तापसीच्या लग्नाची चिंता त्यांना सारखी सतावत असल्याचं ती पुढे म्हणाली. तसंच आईवडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मॅथिअस बोए याला तापसी डेट करतेय. या दोघांच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. "माझ्या आईवडिलांना पसंत नसेल अशा मुलाशी मी लग्न करू शकत नाही. मी ज्यांना आतापर्यंत डेट केलंय, त्यांना मी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती. कारण माझ्या डोक्यात सतत हा विचार असतो की, जर मी त्या मुलाशी लग्न करू शकले, तरच मी त्यावर डेटिंगसाठी वेळ खर्च करू शकते. मला टाईमपास करण्यात काही रस नाही", असं तापसी 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हेही वाचा: काजोलच्या बहिणीने घेतला 'एग फ्रिजिंग'चा निर्णय; आता आई होण्याची चिंता नाही

लग्नाविषयी ती पुढे म्हणाली, "माझ्या आईवडिलांचं हेच मत असतं, की तू लवकरात लवकर लग्न कर. कोणाशीही कर पण आधी लग्न कर. त्यांना माझ्या लग्नाची फार काळजी आहे. कदाचित फार उशीर झाला तर मी लग्नच करणार नाही, ही चिंता त्यांना सतावत असते." प्रोफेशनल आयुष्यात यश गाठल्यावर लग्नाचा विचार करणार असल्याचं तापसीने याआधी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

तापसी लवकरच तेलुगू इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. 'मिशन इम्पॉसिबल' या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. तापसीचा 'हसीन दिलरुबा' हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिने विक्रांत मेस्सीसोबत भूमिका साकारली होती. 'रश्मी रॉकेट', 'लूप लपेटा' आणि 'शाबाश मिठू' या चित्रपटांमध्येही ती भूमिका साकारणार आहे.

loading image