लॉकडाऊनमध्ये भावासोबत किराणा खरेदीसाठी गेलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला कोणीच ओळखू शकलं नाही..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती मात्र तिला कोणीच ओळखु शकलं नाही तर तुमचा विश्वास बसेल का? होय असाच मजेशीर किस्सा तुमच्या लाडक्या अभिनेत्रीच्या बाबतीत घडला आहे

मुंबई- लॉकडाऊनमुळे सध्या अनेक सेलिब्रिटी घरातंच आहेत. घरातूनंच ते आपल्या चाहत्यांशी सोशल मिडियाच्या माध्यामातून संवाद साधत आहेत. मात्र आता जर तुम्हाला सांगितलं की बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती मात्र तिला कोणीच ओळखु शकलं नाही तर तुमचा विश्वास बसेल का? होय असाच मजेशीर किस्सा तुमच्या लाडक्या अभिनेत्रीच्या बाबतीत घडला आहे आणि तीने तो सोशल मिडियावर पोस्ट देखील केला आहे.

हे ही वाचा: रुही आणि यशसोबत करण जोहरने खेळलेला हा रॅपिड फायर राऊंड पाहाच..

त्याचं झालं असं की घरातील सामान खरेदी करण्यासाठी ही अभिनेत्री तिच्या भावासोबत घराबाहेर पडली मात्र संपूर्ण सामान घेऊन झालं तरी तिला कोणीही ओळखू शकलेलं नाही. ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा तिच्या भावासोबत खरेदीसाठी गेली होती. मात्र दोघांनी मास्क घातल्याने त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही.

लॉकडाऊनमुळे श्रद्धा ब-याच दिवसांनंतर घराबाहेर पडली. तिचा तिचे अनुभव देखील तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.श्रद्धा कपूरने तिच्या भावासोबतचा सेल्फी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना श्रद्धाने लिहिलंय, सिद्धार्थ भैयासोबत ग्रॉसरी ऍडवेंचर. यावर श्रद्धाचा भाऊ सिद्धांतने कमेंट केलीये. सिद्धार्थने म्हटलंय. किती मजा आली ना. आपण हे असं रोज केलं पाहिजे (मी मस्करी करतोय).

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Groceries adventure with my bhaiya @siddhanthkapoor 

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

लॉकडाऊन नसतं आणि श्रद्धा अशीच घराबाहेर पडली असतील तर साहजिकंच आपण अंदाज लावू शकतो की चाहत्यांची किती गर्दी तिच्याभोवती जमा झाली असती. यावेळी लॉकडाऊन सुरु असल्या कारणाने रस्त्यावर लोकांची गर्दी नाहीये तसंच श्रद्धाने मास्क देखील लावला होता त्यामुळे तिला कोणीच ओळखू शकलं नाही. म्हणूनंच ती स्वतः जाऊन सगळं सामान खरेदी करुन आली.

shraddha kapoor with brother siddhant kapoor went to grocery buying  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shraddha kapoor with brother siddhant kapoor went to grocery buying