फोटोग्राफर्समुळे श्रद्धा कपूरचं खासगी चॅट झालं व्हायरल

श्रद्धा कपूरचे चाहते भडकले
shraddha kapoor
shraddha kapoor

बॉलिवूड सेलिब्रिटींची एक झलक टिपण्यासाठी फोटोग्राफर्स, पापाराझी तासनतास वाट पाहत उभे असतात. शूटिंगच्या सेटवर, जिमच्या बाहेर.. सेलिब्रिटी जिथे जातील तिथे त्यांच्या मागे पापाराझींची गर्दी जमते. पापाराझींनी काढलेले अभिनेत्री श्रद्धा कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोंमुळे श्रद्धाचे चाहते पापाराझींवर टीका करत आहेत. शूट संपल्यानंतर सेटच्या बाहेर येतानाचे श्रद्धाचे हे फोटो आहेत. यामध्ये ती मोबाइलवर कोणाशी तरी चॅटिंग करताना पहायला मिळतेय. या चॅटचे क्लोज अप फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पापाराझींवर टीका केली जातेय. (Shraddha Kapoor Fans Slam Paps For Leaking Actors Personal WhatsApp Chat slv92)

श्रद्धा तिच्या मोबाइलमध्ये चॅट करत असताना पापाराझींनी मागून तिचे हे फोटो काढले आहेत. हृदयाचे तीन इमोजी असलेलं नाव तिने सेव्ह केलंय. पापाराझींनी तिच्या खासगी चॅटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावरूनच श्रद्धाच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. 'ही जर मस्करी असेल तर आम्हाला अजिबात आवडलं नाही', असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नको, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. 'हे खूप चुकीचं आहे. दुसऱ्यांचं चॅट अशा पद्धतीने वाचणं अत्यंत चुकीचं आहे', असंही नेटकऱ्यांनी लिहिलंय. काहींनी हे फोटो फोटोशॉप केल्याचाही अंदाज वर्तवला आहे.

श्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. त्याआधी अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. श्रद्धा कपूर नुकतीच 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' आणि 'बागी ३' या चित्रपटांत झळकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com