Shraddha WalkerMurder: श्रद्धा वालकर हत्याकांडावर चित्रपट बनवणार...नावाचीही घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Walker Murder case

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडावर चित्रपट बनवणार...नावाचीही घोषणा

दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्यानं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रियकरानंच तिची हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडालीय.

श्रद्धा वालकर ही तरूणी आफताब बरोबर दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. त्यावेळी आफताबने तिचा खून केला आणि तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर त्याने हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहे. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, याची मागणी करण्यात येत आहे.

राम गोपाल वर्मापासून अनेक कलाकारांनी या प्रकरणावर भाष्य केले आणि श्रद्धाच्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाने हृदयद्रावक हत्याकांडावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यामूळे बॉलिवूडमध्ये या हत्याकांड प्रकरणावर चित्रपट बनविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....


इंडिया हेराल्डच्या म्हणण्यानुसार , निर्माता-दिग्दर्शक मनीष एफ सिंग यांनी मुंबईतील श्रद्धा खून प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि सांगितले की त्यांचा चित्रपट लिव्ह-इन बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धा वालकरच्या हत्याकांडावर आधारीत असणार आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर कामही सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

मनीष एफ सिंग यांनी सांगितले की, त्यांचा चित्रपट लव्ह, जिहादवर असेल आणि मुलींना फसविणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे यासारख्या कारस्थानांचा पर्दाफाश करेल. मनीषच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याच्या टीमसोबत चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. वृंदावन फिल्म्सच्या बॅनरखाली बनविण्यात येणाऱ्या या चित्रपटाचे वर्किंग टायटल 'हू किल्ड श्रद्धा वालकर' असे ठेवण्यात आले आहे. त्याच्या टीमने दिल्लीच्या आजूबाजूच्या जंगलातील व्हिडिओ क्लिपचे संशोधन सुरू केले आहे. शूटिंगसाठी लोकेशनही शोधले जात आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणातील आरोपपत्र दाखल करेपर्यंत चित्रपटाची पटकथा निश्चित केली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.