Good Vibes Only : 'रेडिओ जॉकी' ते अभिनेता कसा होता श्रवणचा प्रवास?

रेडिओवर खूप काम केले आणि एके दिवशी मला गुड वाईब्स ओन्ली या चित्रपटाची ऑफर दिग्दर्शक जुगल राजाने दिली.
Shravan Bande Good Vibes Only Web films
Shravan Bande Good Vibes Only Web filmsesakal

Shravan Bane Good Vibes Only Web films : सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत निर्माते व दिग्दर्शक जुगल राजा यांची ‘गुड वाईब्स ओन्ली’ ही वेबफिल्म प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

सर्फिंग या वॅाटर स्पोर्टभोवती फिरणारी ही कथा असून यामध्ये मैत्रीची एक तरल भावना अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने दर्शविण्यात आली आहे. या चित्रपटाव्दारे रेडिओ जाॅकी श्रवण अजय बने अभिनयाची इनिंग खेळण्यास सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे दिवंगत अजय बने यांचा श्रवण हा मुलगा. त्याच्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत.

१. अभिनय करण्याचा विचार तुझ्या मनामध्ये कसा काय आला...

- अंधेरीतील भवन्स महाविद्यालयात शिकत असताना मी एकांकिका वगैरे केल्या होत्या. परंतु भविष्यात अभिनय करावा असा तेव्हा विचार काही मनात नव्हता. काॅलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जाहिरात एजन्सीमध्ये काम करू लागलो. त्यावेळी माझ्या एका मित्राने मला सांगितले की तुझा आवाज खूप छान आहे. तू कधी एक्सप्लोअर केला नाहीस....मग मी प्रयत्न केला आणि रेडिओ जाॅकी म्हणून काम करू लागलो. रेडिओवर नोकरी करीत असताना रेडिओचा मराठी मुलगा श्रवण अशीच माझी ओळख झाली.

रेडिओवर खूप काम केले आणि एके दिवशी मला गुड वाईब्स आॅन्ली या चित्रपटाची आॅफर दिग्दर्शक जुगल राजाने दिली. सुरुवातीला मला खूप धक्काच बसला आणि मी त्याला म्हणालो, की मी हे करू शकेन का...तर तो मला म्हणाला, की या भूमिकेसाठी तूच योग्य आहेस आणि तूच चांगल्या पद्धतीने ही भूमिका करू शकतोस...

मग त्याने मला खूप मार्गदर्शन केले. त्याने मला सल्ला दिला की काही करशील ते नैसर्गिक कर. त्याप्रमाणे मी काम केले आहे. शिवाय रेडिओवर मी काम केले असल्याचा मला खूप फायदा झाला. कारण रेडिओवर काम करीत असताना आपण एक प्रकारची अॅक्टिंगच करीत असतो. फक्त समोरच्या व्यक्तीला आपण दिसत नाही एवढेच. येथूनच माझ्या अभिनयाची इनिंग सुरू झाली.

२. या चित्रपटाची ऑफर तुला आल्यानंतर तू स्वतः काय तयारी केलीस?

- मुळात चित्रपटसृष्टी ही माझ्यासाठी काही नवीन नाही. माझे बाबा अजय बने मराठी चित्रपटसृष्टीतील एक जाणकार जनसंपर्क अधिकारी होते. त्यांनी प्रसिद्धी दिलेल्या कित्येक चित्रपटांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीशी माझी चांगली ओळख आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी मी फारशी काही तयारी केली नाही. परंतु माझी भूमिका कशी आहे व ती कशा पद्धतीने पुढे जाणार आहे याचा बारकाईने विचार केला.

त्या भूमिकेतील बारकावे टिपले आणि त्या भूमिकेचे बेअरिंग कसे पकडता येईल याचा विचार केला आणि मी माझ्या पद्धतीने काम करीत गेलो. आपण अभिनय करतोय...किंवा आपण वेगळे काही तरी करतोय असा विचार मनात ठेवला नाही. जे आपण काही करतोय ते सहजरीत्या करतोय. नैसर्गिक करतोय असे वाटले पाहिजे आणि तसेच मी काम करीत गेलो. मी ही सगळी प्रोसेस खूप इंजॉय केली.

Shravan Bande Good Vibes Only Web films
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

3. रेडिओ जॉकी म्हणून काम करणे वेगळे आणि अभिनय करणे वेगळे आहे. अभिनय करताना कॅमेऱ्याचा सामना करावा लागतो. तू पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केलास तेव्हा तुझ्या मनात काय चालले होते...

- मी थोडा फार घाबरलो होतो. कॅमेऱ्यासमोर उभे राहणे आणि संवाद म्हणणे हा माझ्यासाठी वेगळा आणि पहिलाच अनुभव होता. कारण रेडिओचे जग वेगळे आहे. आम्ही चार भिंतीच्या मध्ये एकटे बसलेलो असतो आणि आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करूनच बोलत असतो. येथे तसे काही नसते. आपल्या आजूबाजूला अनेक जण असतात आणि त्यांच्यासमोर आपल्याला अॅक्टिंग करावी लागते. असो. आरजे असल्याचा फायदा मला अभिनय करताना खूप झाला. मला असे वाटते की रेडिओ जाॅकीची कल्पनाशक्ती इतरांपेक्षा खूप मोठी असते.

४. तू या चित्रपटात श्रवण ही व्यक्तिरेखा साकारीत आहेस. तुझे प्रत्यक्षातील नावही तेच आहे. तर पडद्यावरील श्रवण आणि प्रत्यक्षातील श्रवण यातील फरक काय..

- फरक निश्चितच आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे- लाईफ मला कधी सीरियसली घेत नाही म्हणून मीदेखील लाईफला सीरीयसली घेत नाही... परंतु प्रत्यक्षात मी जीवनाकडे खूप गंभीरपणे पाहतो. प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकतो.

Shravan Bande Good Vibes Only Web films
Gadar 2 : उधारी न दिल्याबद्दल अमिषाला मिळाली नोटीस!

५. तुझ्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल काय सांगशील..

- या चित्रपटातील श्रवण हा देखील आरजे आहे. ही कथा लॉकडाऊनमधील आहे. लॉकडाऊन तर आता झाले आहे. पुढे काय करायचे. यातून बाहेर कसे यायचे याचा विचार या चित्रपटातील दोन कलाकार अर्थात तारा आणि श्रवण करीत असतात. यातील श्रवणची ऊर्जा काहीशी वेगळीच आहे. तो एका कॅम्पेनमध्ये भाग घेण्यास जातो आणि तेथे त्याला तारा भेटते. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सर्फिंग कॅम्पच्या निमित्ताने एकत्र येतात.

सुरुवातीला त्यांच्यामध्ये तू तू मै मै होते आणि त्यातूनच मैत्रीचे बंध फुलत जातात. एखाद्या खेळातून फुलत जाणारी मैत्री छान पद्धतीने मांडण्यात आली आहे. तारा ही भूमिका आरती केळकर हिने साकारली आहे.

Shravan Bande Good Vibes Only Web films
Malaika Arora : लग्नाची तारीख जवळ आलीय!

६. तुझा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. तुझ्या मनामध्ये उत्सुकता किती आणि चिंता किती आहे..

-उत्सुकता अधिक आहे. कारण लहान असताना आपण पहिल्यांदा जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला नेमके काय चाललेले हे काहीच कळत नाही. तशीच अवस्था आता माझी झाली आहे. आर जे म्हणून काम करताना पहिल्यांदा जी माझी अवस्था होती तशीच आता झाली आहे. पुढे काय होणार आहे तेच कळत नाही. काम तर केले आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा येतात याची उत्सुकता अधिक लागलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com