
'माझी तुझी रेशीमगाठ' हि झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेचा आज शेवटचा भाग टेलिकास्ट होणार आहे. आज २२ जानेवारीला रात्री ९ वाजता मालिकेचा शेवटचा महाएपिसोड टेलीकास्ट होणार आहे. यश आणि नेहाची लव्हस्टोरी आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली एक वर्ष हि मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेचा शेवटचा सिनचं शूटिंग पूर्ण झाल्यावर मालिकेतील यश म्हणजेच अभिनेत्री श्रेयस तळपदे भावुक झाला.
(shreyas talpade emotional during last day of shoot of majhi tujhi reshimgath serial )
श्रेयसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत दिग्दर्शक शेवटच्या सिनला कट म्हणतात आणि सगळी टीम एकच आनंद साजरा करते. श्रेयस पाठ वळवतो आणि भावुक होतो. तो मालिकेतील कलाकारांना म्हणजेच मायरा, संकर्षण अशा सर्वांना मिठी मारतो. हा व्हिडिओ पोस्ट करून श्रेयसने मनातल्या भावना व्यक्त केल्या.
श्रेयस लिहितो, "शो संपतोय….आपलं नात नाही…. आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??" असं श्रेयस म्हणाला. श्रेयसने दिलेलं कॅप्शन बघून माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा तिसरा सिझन येणार का असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडलाय.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा शेवटचा भाग २२ जानेवारीला झी मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा शेवटचा भाग महाएपिसोड असणार आहे. २२ जानेवारीला रात्री ९ वाजता हा महाएपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट नक्की कसा होतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या मालिकेत यश आणि नेहाच्या भूमिकेत दिसले. बालकलाकार मायरा वायकुळ मालिकेत परीच्या भूमिकेत झळकली. यश आणि नेहाला जितकी प्रसिद्धी मिळाली तशीच प्रसिद्धी परीलाही मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.