श्रेयस म्हणणार स्माईल प्लीज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

"आभाळमाया' या मालिकेतून श्रेयस तळपदेने आपल्या टीव्ही करियरला सुरुवात केली. त्यानंतर "दामिनी', "अवंतिका', "बेधुंद मनाची लहर' अशा विविध मालिकांतून श्रेयस घराघरात पोहोचला. पण, नंतर तो चित्रपट आणि बॉलीवूडकडे वळला आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसलाच नाही. आता अनेक वर्षांनी श्रेयस छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय. झी युवावरील "गुलमोहर' या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा ओकबरोबर तो दिसणार आहे. "गुलमोहर' मालिकेत अनेक छोट्या छोट्या हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात येणार आहेत. मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

"आभाळमाया' या मालिकेतून श्रेयस तळपदेने आपल्या टीव्ही करियरला सुरुवात केली. त्यानंतर "दामिनी', "अवंतिका', "बेधुंद मनाची लहर' अशा विविध मालिकांतून श्रेयस घराघरात पोहोचला. पण, नंतर तो चित्रपट आणि बॉलीवूडकडे वळला आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसलाच नाही. आता अनेक वर्षांनी श्रेयस छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय. झी युवावरील "गुलमोहर' या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा ओकबरोबर तो दिसणार आहे. "गुलमोहर' मालिकेत अनेक छोट्या छोट्या हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात येणार आहेत. मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. गुलमोहर मालिकेतील पहिली कथा "स्माईल प्लीज'मधून श्रेयस आणि गिरीजा पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन करणार आहेत. 22 जानेवारीपासून ही मालिका झी युवावर दाखवण्यात येणार आहे. श्रेयस त्याच्या या पुनरागमनाबद्दल म्हणाला, "मला जेव्हा झी युवाने "गुलमोहर'मधील पहिली कथा "स्माईल प्लीज'साठी विचारलं तेव्हा माझं हो म्हणणं अपेक्षितच होतं. कारण या गोष्टीत माझ्याबरोबर गिरीजा ओक, उदय सबनीस, उदय टिकेकर अशी मंडळी काम करत आहेत आणि मंदारसारखा चांगला दिग्दर्शक या मालिकेसाठी लाभला आहे. त्यामुळे मला ही मालिका करताना आनंदच होतोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shreyas talpade smile please gulmohar secial