esakal | 'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधला 'शिऱ्या' बनलाय कोविड वॉरिअर

बोलून बातमी शोधा

Vikas Kadam
'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधला 'शिऱ्या' बनलाय कोविड वॉरिअर
sakal_logo
By
स्वाती वेमूल

केदार शिंदे दिग्दर्शित 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका आठवतेय का? या मालिकेत शिऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता विकास कदम सध्याच्या कोविड काळात मुंबईकरांची मदत करत आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये विकासने कोविड टेस्टिंग लॅब उभी केली असून कोणताही गाजावाजा न करता तो हे काम करत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून विकास हे काम करतोय.

याविषयी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत विकास म्हणाला, "कोविडची पहिली लाट मी खूप जवळून अनुभवली. त्यावेळीसुद्धा मी मास्क आणि सॅनिटाइझर यांचं मोठ्या प्रमाणावर वाटप केलं होतं. माझ्या एका मित्राने फार्मा केल्याने आम्ही दोघांनी मिळून लॅब सुरू करायचं ठरवलं. गेल्या आठ महिन्यांपासून ही लॅब २४ तास चालू आहे. वांद्रे, कुर्ला इथली मुलं या लॅबमध्ये काम करतात. हे काम करत असताना मलासुद्धा दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती." रेल्वेत काम करणाऱ्यांचे, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस इत्यादींचे स्वॅब विकासच्या लॅबमध्ये टेस्टिंगसाठी येतात.

हेही वाचा : 'येणार तर मोदीच'; सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

विकासने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. 'सिंघम' या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या टीममध्ये पडद्यामागचीही कामं करत होता.