
star pravah :मनोरंजन विश्वातील एक उत्तम अभिनेता म्हणजे गौरव घाटणेकर. गेली अनेक वर्ष तो मालिका आणि एकूण मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. गौरव केवळ अभिनयच नाही तर लेखन दिग्दर्शनही करतो. विशेष म्हणजे त्याची पत्नी मोठी अभिनेत्री आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे 'श्रुती मराठे'. गौरव आणि श्रुतीने २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या गौरव बऱ्याच वर्षांनी मालिकेमध्ये अभिनय करत आहे. स्टार प्रवाह मधील 'अबोली' या मालिकेत त्याची एंट्री होणार आहे. (shruti marathe husband actor gaurav ghatnekar play advocate role in aboli serial on star pravah)
स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. सुप्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
अबोली मालिकेतील ही वकिलाची भूमिका साकारण्यासाठी गौरव अतिशय उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना गौरव म्हणाला, ‘मी याआधी बऱ्याचदा वकिलाची भूमिका साकारली आहे. मला वकिलाची भूमिका साकारायला अतिशय आवडतं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वकील साकारताना अतिशय ताकदीचे संवाद सादर करता येतात. एक अभिनेता म्हणून मला हे अतिशय आव्हानात्मक वाटतं.' अजिंक्य राजाध्यक्ष हा तत्वनिष्ठ वकील आहे. अबोली निर्दोष आहे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा तिला न्याय मिळून देण्याच्या एकमेव हेतूने तो ही केस हाती घेतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अबोलीच्या विरोधात अजिंक्यची सावत्र बहिण विजया राजाध्यक्ष केस लढत आहे. त्यामुळे अबोलीला न्याय मिळवून देण्यासाठी गौरव जीवापाड मेहनत घेणार आहे अशी भावना गौरव घाटणेकरने व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.