सैफच्या मुलासोबत पलक तिवारी; फोटोग्राफर्सनी पाहताच लपवला चेहरा

पलक ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी असून इब्राहिम खानसोबत तिला पाहताच चर्चांना उधाण
Palak Tiwari, Ibrahim Ali Khan
Palak Tiwari, Ibrahim Ali Khan Instagram, Viral Bhayani
Updated on

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खानसोबत (Ibrahim Ali Khan) एकाच गाडीमध्ये बसलेली पहायला मिळत आहे. मात्र पापाराझींनी या दोघांना बघितल्यानंतर तिने चेहरा लपवला आहे. पलक ज्या पद्धतीने चेहरा लपवत असल्याचं पाहून नेमकं या दोघांमध्ये काय शिजतंय, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतल्या एका कॅफेमध्ये हे दोघं गेले होते. तिथून बाहेर पडताना दोघांनी फोटोग्राफर्स आणि पापाराझींना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.

इब्राहिमने यावेळी काळ्या रंगाचा टी-शर्ट, डेनिम आणि त्यावर जॅकेट परिधान केला होता. तर पलक तिवारीचा स्पघेटी टॉप आणि डेनिम असा कूल लूक पहायला मिळाला. पापाराझींना पाहून पलकने तिचा चेहरा का लपवला, याबाबत नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. 'तुम्ही खूप प्रयत्न केलात, मात्र तुमच्यापेक्षा जास्त हुशार पापाराझी असतात', असं एकाने लिहिलं. तर 'या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय', असा प्रश्न दुसऱ्याने केला. 'चेहरा लपवण्याची काहीच गरज नव्हती', असंही एकाने म्हटलंय.

Palak Tiwari, Ibrahim Ali Khan
प्रियांका चोप्रा झाली आई; चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'

पलकने हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडीओतून पदार्पण केलं. हा व्हिडीओ तुफान हिट ठरला. पार्ट्यांमध्ये अजूनही या गाण्याची क्रेझ पहायला मिळते. ती लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयच्या 'रोझी' या चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे इब्राहिम सध्या करण जोहरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com