Shyam Benegal: श्याम बेनेगेल यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती देताना त्यांची मुलगी खूप भडकली, बघा काय घडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shyam benegal, shyam benegal news, shyam benegal family

Shyam Benegal: श्याम बेनेगेल यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती देताना त्यांची मुलगी खूप भडकली, बघा काय घडलं

Shyam Benegal News: भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या प्रकृती बिघडल्याचे एक मोठी बातमी नुकतीच समोर आली.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. याशिवाय श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याची माहिती पुढे आली.

(Shyam Benegal's daughter got angry while giving big information about his condition)

अशातच श्याम बेनेगल यांची मुलगी मात्र या सर्व प्रकरणात प्रचंड रागावली आहे. श्याम बेनेगल यांची मुलगी पिया म्हणाली, "सर्व माहिती आणि ऑनलाइन पसरवणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत,"

पिया पुढे म्हणाली, “सध्या तुम्ही याविषयी विचारणं योग्य नाही. ते काही दिवसात स्वस्थ आणि फिट होतील.

डॉक्टर घरी येत आहेत, त्यांचं घरीच डायलिसिस होत आहे, ते इतके आजारी आहेत की त्याला हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, अशी सर्व चुकीची माहिती आहे,”असं पिया मीडियावर रागवत म्हणाली.

पिया स्पष्ट केलं की, "तिचे वडील बरे आहेत.. ते कधीतरी ऑफिसमध्ये परत येतील... त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी आता त्यांनी रिटायर व्हायला हवे असं वाटत नाही का?" असं पियाने स्पष्ट केलंय.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या गेलेल्या श्याम बेनेगल यांची ओळख काही भारतापुरती सीमित नाही. तर जगभरातील विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेले आहेत.

भारतामध्ये ज्या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपटाची चळवळ सुरु केली त्यामध्ये श्याम बेनेगल यांचे नाव आघाडीनं घ्यावे लागेल. चित्रपट हाच ध्यास आणि चित्रपट हाच श्वास या ध्येयानं श्याम बेनेगल यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

केवळ चित्रपटच नाहीतर भारत एक खोज सारखी मालिका असो किंवा संविधानाच्या निर्मितीवर तयार केलेला माहितीपट असो या सगळ्याला अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

जगभरातील चित्रपट विषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांमध्ये श्याम बेनेगल यांचे नाव अगत्यानं घेतले जाते. तिथे त्यांचे चित्रपट अभ्यासक्रमाचा भाग आहेत.

टॅग्स :Marathi News Bollywood