
सिद्धांत चतुर्वेदीला करायचं होतं लग्न,पण ऐनवेळी गर्लफ्रेंडने दिला दगा
'गहराइयां'(Gehraiyaan) सिनेमातील अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं(Siddhant Chaturvedi) नुकतंच एका मुलाखतीत आपल्या ब्रेकअपची कहाणी सांगितली. त्यानं एका मुलाखतीत बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी आपण तब्बल चार वर्ष रीलेशनशीपमध्ये होतो,इतकंच नाही तर त्या मुलीसोबत आपल्याला लग्न करुन सेटल व्हायचं होतं याचाही खुलासा त्यानं केला. सिद्धांतच्या 'गहराइयां' सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तसं पाहिलं तर मग सिनेमा फ्लॉपही म्हणता येणार नाही ना हीट म्हणता येईल. पण यातच सिनेमाचं यश दडलं आहे. जे सिद्धांतला बॉलीवूडमध्ये इनिंग चांगल्या प्रकारे खेळता येईल यासाठी पुरेसं आहे. 'गहराइयां' सिनेमात त्यानं झैन ही व्यक्तिरेखा साकारली आहे,जो C.A झालेला असतो.
हेही वाचा: गायक मिका सिंगचं 'स्वयंवर!';लग्नासाठी घातलीय 'ही' अट
सिद्धांतने 'गहराइयां' सिनेमा आधी 'बंटी और बबली २' आणि 'गल्ली बॉय' सिनेमात काम केलेलं आहे. तर 'गहराइयां' मध्ये तो दीपिका पदूकोण,अनन्या पांड्ये सोबत,धैर्य कारवासोबत सिनेमात दिसला आहे. एका इंग्रजी मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्याला प्रश्न करण्यात आला की,'अशी कोणती गोष्ट आहे ज्यानं त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला?' त्यावर तो म्हणाला,''माझं ब्रेकअप''. तो पुढे म्हणाला,''मी जवळ-जवळ चार वर्ष रीलेशनशीपमध्ये होतो. वयाच्या २० व्या वर्षी माझं आयुष्य ब्रेकअपमुळे एका अशा वळणावरआलं जिथे मला काहीच सुचत नव्हतं. मी C.A करत होतो''.
हेही वाचा: अनिल कपूरनी 'जुदाई' सिनेमाला दिला होता नकार;श्रीदेवी हे कारण होतं का?
''माझ्या गर्लफ्रेंडला वाटत होतं मी शिक्षण पूर्ण करून सेटल व्हावं. पण त्यावेळी अचानक मला वाटू लागलं मी अभिनय करावा. आणि मी तसं तिला बोलून दाखवलं पण तिला ते मान्य नव्हतं. आणि आमचं ब्रेकअप झालं. पण तिथून सुरू झाला माझा बॉलीवूड प्रवास. खरंतर मी आतून तुटलो होतो,पण माझ्या स्वप्नानं मला उभं केलं. आणि आज मी इथे आहे. सिद्धांत लवकरच 'भूतनाथ' सिनेमात कतरिना कैफ,ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. 'खो गए हम कहा' या आगामी सिनेमात देखील तो दिसणार आहे.
Web Title: Siddhant Chaturvedi Says His Breakup With Girlfriend Of 4 Years Changed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..