गायक मिका सिंगचं 'स्वयंवर!';लग्नासाठी घातलीय 'ही' अट

आपल्या गाण्यांनी लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मिका सिंगचे चाहते जगभरात आहेत.
Mika Singh
Mika SinghGoogle

आपल्या गाण्याच्या तालावर लोकांना पाय थिरकायला लावणारा सिंगर मिका सिंग(Mika Singh)चे चाहते भारतातच नाहीत तर जगभरात पसरले आहेत. या सगळ्यांसाठी मिका लवकरच एक खूशखबर देणार आहे. मिका सिंग लग्न करीत आहे पण जरा हटके पद्धतीनं. आणि त्या हा सोहळा रंगणार आहे चक्क छोट्या पडद्यावर. तर हो,खबर पक्की आहे. मिका सिंगनं लग्नासाठी स्वयंवराचा पर्याय निवडला आहे. काय आहे नेमकी बातमी? चला,सविस्तर जाणून घेऊया. राखी सावंत नंतर आता गायक मिका सिंग नॅशनल टेलीव्हिजनवर स्वयंवर करताना दिसणार आहे. याआधी रतन राजपूत आणि मल्लिका शेरावत यादेखील स्वयंवर करताना दिसल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार हा शो पहिल्या शो सारखाच असणार आहे,यात फारसे बदल करण्यात आलेले नसून काही महिन्यातच हा शो सुरु होईल. पण सांगितलं जात आहे की मिका या शो मध्ये लग्न करणार नसून फक्त साखरपुडा करताना दिसेल आणि त्यानंतर तो वैयक्तिक आयुष्यात ते नातं पुढे नेणार आहे.

मिका सिंगने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''तो यो शो मध्ये भाग घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे''. या शो मध्ये जे स्पर्धक भाग घेणार आहेत ते भारतामधूनच असणार आहेत. याआधी अशा पद्धतीच्या शो वरनं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते. कारण रतन राजपूत,मल्लिका शेरावत,राखी सावंत यांनी शो मध्ये निवडलेल्या जोडीदारासोबत पुढे लग्न केले नाही. पण राहुल महाजनने मात्र डिंपी गांगुलीसोबत लग्न केलं होतं. पाच वर्ष ते एकत्रही राहिले,नवरा-बायको म्हणून संसारही केला पण पुढे २०१५ मध्ये ते वेगळे झाले. मल्लिका शेरावत आपल्याला 'द बॅचलर इंडिया,मेरे खयालों की मलिका' या कार्यक्रमात दिसली होती. त्या कार्यक्रमात तिनं विजय सिंग नामक व्यक्तीची आपला जोडीदार म्हणून निवड केली होती. हा शो २०१३ मध्ये संपला. त्यानंतर या दोघांना काही काळासाठी एकत्र पाहिलं गेलं. पण नंतर मात्र ते दोघे वेगळे झाल्याची बातमी कानावर आली. रतन राजपूतने देखील अभिनव शर्मासोबत साखरपुडा केला होता,या अशा पद्धतीच्या शोमधून. पण जसा शो बंद झाला,तसं यांच्यातील नातंही तिथेच थांबलं.

Mika Singh
'व्हेंटिलेटरवर असणाऱ्या थिएटर्सना आता गंगूबाईच...' कंगनाची नवीन पोस्ट

बोललं जात आहे की,राखी सावंत(Rakhi Sawant) देखील मिका सिंगच्या यो शो मध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकते. खरंतर राखी-मिका मधील किसिंग वाद सगळ्यांनाच माहित आहे. त्यावेळी राखीनं अनेक मुलाखती देऊन मिका सिंगला जगणं मुश्किल केलं होतं. त्यामुळे आता जर राखी मिका सिंगच्या कार्यक्रमात भाग घेईल तर छोट्या पडद्यावर पुन्हा मिका-राखीमधील टशन दिसणार हे १०० टक्के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com