Siddhant Kapoor: सिद्धांत कपूरला जामीन मंजूर, मात्र पोलिसांनी घातली अट

बंगळूर येथील रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. वैद्यकीय चाचणीत त्यानं ड्रग्ज घेतल्याचं सिद्ध झालं होतं.
Siddhanth Kapoor RELEASED on bail
Siddhanth Kapoor RELEASED on bailGoogle

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर(Siddhant Kapoor) याची ड्रग्ज केसमध्ये(Drugs Case) अटक झाल्यानंतर आता जामिनावर सुटका झाली आहे. वैद्यकीय तपासणीत सिद्धांतनं ड्रग्ज घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याला आता Station Bail मिळाल्याची बातमी आहे. म्हणजेच सिद्धांतला पोलिसांनी ऑन टेबल हमीपत्र घेऊन त्याची सुटका केली आहे.(Siddhanth Kapoor RELEASED on bail)

Siddhanth Kapoor RELEASED on bail
Siddhanth Kapoor Drugs Case: रेव्ह पार्टीतील 'तो' Video viral, मोठा खुलासा

सिद्धांतसोबत त्या रेव्ह पार्टीत(Rave Party) ज्या इतर पाच जणांना अटक झाली होती त्यांची देखील Station Bail धर्तीवर सुटका करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी चौकशीसाठी यापुढे केव्हाही बोलावले तरी सिद्धांत कपूरसह इतर जामीनावर सुटका झालेल्या पाच जणांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावं लागेल या अटीवर ही सुटका करण्यात आली आहे. यासंदर्भात डीसीपी भीमाशंकर गुलेड यांनी माहिती दिली आहे.

Siddhanth Kapoor RELEASED on bail
'सिद्धांत कपूरला अटक करण्याऐवजी जर...' लव सिन्हाचा तपास अधिकाऱ्यांना सल्ला

सिद्धांत कपूरला रविवारी बंगळुरु पोलिसांनी रेव्ह पार्टीतून ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणात अटक केली होती. त्या पार्टीत सिद्धांत डीजे म्हणून गेला होता. पार्टीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले त्यातून यासंदर्भात खुलासा झाला होता. या केसप्रकरणात अधिक माहिती देताना डीसीपी भीमाशंकर गुलेड म्हणाले होते की,''सिद्धांत कपूर हा वैद्यकीय तपासणीत दोषी आढळला आहे. या तपासणीतून स्पष्ट झाले आहे की त्यानं ड्र्ग्जचे सेवन केले होते. त्याला आम्ही ताब्यात घेतलं आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले जाईल''. मात्र आता सिद्धांत कपूरला जामीन मिळाल्यानं त्याची सुटका करण्यात आली आहे.

Siddhanth Kapoor RELEASED on bail
Siddhant Kapoor: पार्टीत लपवलेले गांजा,MDMA?; DCP चा मोठा खुलासा

बंगळुरू मधील या रेव्ह पार्टीविषयी पोलिसांना खबर मिळाली होती. त्यानुसार प्लॅन करुन पोलिसांनी पार्टीवर छापा टाकला होता. यानंतर तब्ब्ल ३५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली होती. त्यात सहा जणांनी ड्रग्ज घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. कोणाजवळ वैयक्तिकरित्या ड्रग्ज सापडलं नसले तरी पार्टी ज्या हॉटेलमध्ये होती तिथे एके ठिकाणी गांजा आणि MDMA सापडलं आहे. हॉटेलला पोलिसांनी यासंदर्भात नोटीस पाठवलं आहे. तसंच, ज्या कोणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ते ड्रग्ज गायब करण्याचा प्रयत्न केला आहे,त्याचा सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्यानं तपास लावला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे, असं डीसीपी गुलेड म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com