Siddharth Chandekar: नवीन वर्षात सिद्धार्थ चांदेकरवर होणार 'श्रीदेवी प्रसन्न'! 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

सिद्धार्थ चांदेकरच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. २०२४ मध्ये हा सिनेमा भेटीला येणार आहे
siddharth chandekar and sai tamhankar new movie Sridevi Prasanna announcement
siddharth chandekar and sai tamhankar new movie Sridevi Prasanna announcement SAKAL

Siddharth Chandekar Movie Sridevi Prasanna News: २०२४ ला लवकरच सुरुवात होणार आहे. या वर्षात अनेक हिंदी - मराठी सिनेमांची पर्वणी लोकांना पाहायला मिळणार आहे.

अशातच २०२४ मधील नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय. हा सिनेमा म्हणजे श्रीदेवी प्रसन्न. नावापासुनच वेगळेपणा असणाऱ्या या सिनेमाबद्दल अधिक जाणून घ्या.

siddharth chandekar and sai tamhankar new movie Sridevi Prasanna announcement
Koffee With Karan 8: वयाने १३ वर्ष मोठ्या अमृताशी लग्न केल्यावर सैफची आई शर्मिला यांची काय होती पहिली प्रतिक्रिया?

"श्रीदेवी प्रसन्न" या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलीवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे.

आजवर अनेक हीट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक वेगळीच प्रेमकहाणी फुलवणार आहेत. या निमित्ताने नव्या वर्षात, एक नवी आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वांखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्हस्टोरी सोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा असणार यात शंका नाही.

siddharth chandekar and sai tamhankar new movie Sridevi Prasanna announcement
Bhau Kadam - Devendra Fadanvis: आणि फडणवीसांनी भाऊंना कडकडून मिठी मारली, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे.

हा सिनेमा २ फेब्रुवारी २०२४ पासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com