'तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही'; तिच्यासाठी सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट | Siddharth Chandekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Chandekar

'तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही'; तिच्यासाठी सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घरातील काम, कुटुंबीयांच्या गरजा, मुलांबाळांची कामं, ऑफिसमधील दगदग या रोजच्या धावपळीत 'ती' स्वत:साठी वेळ काढायला विसरूनच जाते. तू स्वत:साठी वेळ काढ, असं कोणीतरी तिला केवळं म्हटलं तरी ते पुरेसं होतं. अशा प्रत्येकीसाठी मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने एक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

'तिच्यासाठी' असं शीर्षक देत सिद्धार्थने लिहिलं, 'कशी आहेस? दमली आहेस ना? एक काम कर, जरा वेळ बस. हा चहा घे. केवढी दगदग करतेस? घरातलं पण बघा, व्यवसाय पण बघा, पोरं बाळं पण सांभाळा, तुम्हालाच जमू शकतं हे. आमच्यात नाही बाबा एवढी ताकद. पण आता जरा थांब. मस्त फिरून ये. मोकळी होऊन ये. नव्या मैत्रीणी कर,मज्जा कर. तुला परवानगी देणार मी कोणीच नाही, तूच स्वतःला परवानगी दे. डोकं इथेच ठेव आणि त्या मनाला जग दाखवून ये. मी सांभाळतो तोपर्यंत इथलं. पण ये काय, तुझ्याशिवाय पान हलत नाही आमचं.' या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिलं, 'तू हसलीस की घरात रंग येतात. तू मज्जा करत असलीस की जग सुंदर दिसतं. जा, फिरून ये, जग बघून ये. मी आहेच.' त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्याच्या लिखाणाचं आणि विचारांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा: ..अन् रजनीकांत यांच्या डोळ्यात आलं पाणी

झिम्मा चित्रपट हा बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट आहे. हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. वेगवेगळ्या वयोगटातील, वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या ७ महिला त्याच्या कामातून वेळ काडून पहिल्यांदाच घराबाहेर पडतात आणि एका टुरिंग कंपनीसोबत ब्रिटनला ट्रीपला जातात. त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडतं, त्या कशी धमाल मस्ती करतात, या ट्रीप त्यांच्या आयुष्यात काय वळण येतं, हे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव, क्षिती जोग, सुहास जोशी हे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक हेमंत ढोमेने केलं आहे.

loading image
go to top