Siddharth Jadhav: 25 फुटाचा भला मोठा कटआऊट अन् दुधाचा अभिषेक; महाराष्ट्राचा लाडका सिद्धू म्हणतो, "जाम भारी फिलिंग!"

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Siddharth Jadhav
Siddharth Jadhav esakal
Updated on

Siddharth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) लग्न कल्लोळ (Lagna Kallol) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशताच सिद्धार्थनं या चित्रपटाबद्दल नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थनं 25 फुटांच्या कटआऊटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं खास कॅप्शन देखील दिलं आहे.

सिद्धार्थची पोस्ट

सिद्धार्थनं त्याच्या कटआऊटचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "जाम भारी फिलिंग! लग्न कल्लोळच्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरच विश्वास बसत नाहीये. आज कोपरगावमध्ये लग्न कल्लोळचा प्रिमियर होता आणि थिएटरच्या बाहेर माझा 25 फुटाचा भला मोठा cutout उभारला गेला..त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला..(ते दूध प्रतिकात्मक होतं.. दूध वाया जाऊ नये म्हणुन ते दूध 500 विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं.) माझ्या 24 वर्षाच्या या छोट्याश्या कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडतंय. बापरे काय कमाल वाटत होतं."

"खरंच मयूर सर आणि संपुर्ण टीम चे मनापासून आभार.. मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशिर्वाद मिळतोय तो खरच स्वप्नवत आहे. लग्न कल्लोळला मिळणारा प्रतिसाद खुप भारी आहे.हा अभिषेक म्हणजे तुमच्यातल्याच एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे.Lv u all..असाच प्रेम असुदे!" असंही सिद्धार्थनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav: "राज ठाकरे स्वतः उतरले अन्.." सिद्धार्थनं शेयर केला विलक्षण अनुभव

सिद्धार्थनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थच्या लग्न कल्लोळ या चित्रपटामध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांनी देखील काम केलं आहे. हा चित्रपट काल (1 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सिद्धार्थचे चित्रपट

सिद्धार्थनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केलं आहे. सिद्धार्थनं सिम्बा, सर्कस या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तसेच सिद्धार्थनं दे धक्का, धुराळा, हुप्पा हुय्या या चित्रपटात देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com