Sidharth Kiara Wedding: अरेच्चा.. सिद्धार्थ - कियाराच्या लग्नाच्या तारखेत गोंधळ, आता या दिवशी करणार लग्न?

सिद्धार्थ - कियारा उद्या ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार होते
Sidharth Kiara Wedding, Sidharth malhotra Kiara advani Wedding
Sidharth Kiara Wedding, Sidharth malhotra Kiara advani WeddingSAKAL
Updated on

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding: आता तमाम लोकांना वेध लागले आहेत ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे. हे क्युट कपल बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासून लव्हबर्ड म्हणून ओळखले जाते. या दोघांच्या लग्नासाठी करण जोहर पासून शाहिद कपूर पर्यंत सगळे जण मुंबईतून रवाना झाले आहेत.

राजस्थान मधील जैसलमेरला सुर्यगढ पॅलेस मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. परंतु लग्न ऐन तोंडावर असताना दोघांच्या लग्नासबंधी एक मोठी बातमी समोर आलीय.

(Siddharth - Kiara's wedding date postponed)

Sidharth Kiara Wedding, Sidharth malhotra Kiara advani Wedding
Alka Kubal : अलका कुबलच्या पोरी कमाल! थोरली मुलगी पायलट तर धाकटी झालीय आत्ता...

सिद्धार्थ - कियारा उद्या ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार होते. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार दोघांच्या लग्नाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आलाय. त्यामुळे ठरलेल्या तारखेला सिद्धार्थ - कियारा लग्न करणार नाहीत. तर या दोघांच्या लग्नाची तारीख एक दिवस पुढे गेलीय. म्हणजेच ६ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारीला या दोघांचा आलिशान लग्नसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुले सिद्धार्थ - कियाराचा लग्नसोहळा पाहण्यासाठी त्यांच्या फॅन्सना आणखी एक दिवस वाट पाहायला लागणार आहे

Sidharth Kiara Wedding, Sidharth malhotra Kiara advani Wedding
Dnyanada Ramtirthakar: परी म्हणू की सुंदरा ... अप्पू फेम ज्ञानदाची घायाळ करणारी अदा

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाबद्दल अपडेट द्यायचं झालं तर या दोघांच्या लग्नासाठी ३ फेब्रुवारीपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होईल. या जोडप्याने पाहुण्यांसाठी मजेदार वाळवंट सफारी टूर आणि फूड स्टॉल्सची व्यवस्था केली आहे. जैसलमेरला भेट देणाऱ्या पाहुण्यांसाठी स्पेशल गिफ्ट म्हणून त्यांनी स्पा व्हाउचरचाही समावेश केला आहे. त्यामुळे सिद्धार्थ - कियारा दोघे त्यांच्या लग्नात खुश असणार आहेतच शिवाय लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची सुद्धा मज्जा आहे.

गेली ३ - ४ वर्ष हे सिद्धार्थ - कियारा एकमेकांना डेट करत आहेत. आता येत्या ६ फेब्रुवारीला हे दोघे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय. दोघांनी कधी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला नसला तरीही दोघांच्या लग्नासाठी त्यांचे फॅन्स मात्र आतुर आहेत. दोघांची क्युट जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कियारा आपल्याला शेवटी 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमात दिसली, तर सिद्धार्थचा 'मिशन मजनू' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rhea Chakraborty opens up about marriage plans and brother Showik
Emergency Response and Administrative Oversight
Marriage problems
SIDDHARTH JADHAV
Marathi News Esakal
www.esakal.com