Kiara-Sidharth Anniversary: पहिली भेट अन् फिल्मी स्टाईल प्रपोज; कियारा आणि सिद्धार्थची 'प्यारवाली लव्हस्टोरी' माहितीये?

Kiara-Sidharth Anniversary: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या रोमँटिक लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात...
Kiara-Sidharth Anniversary
Kiara-Sidharth Anniversary

Kiara-Sidharth Anniversary: अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani) ​​हे बी-टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. आज या दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या रोमँटिक लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात...

सिद्धार्थ आणि कियारा यांची पहिली भेट

रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. कियाराने सांगितले की, 'लस्ट स्टोरीज' या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये दोघेही पहिल्यांदा भेटले होते.

सोशल मीडियावर डेटिंगची चर्चा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांच्यामध्ये खास बॉन्ड निर्माण झाला. चित्रपटाच्या शूटिंगनंतर दोघेही अनेकदा लंच डेटवर जात होते. त्यामुळे सिद्धार्थ आणि कियारा यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली.

2019 मध्ये बी-टाऊन सेलिब्रिटींच्या पार्टीत सिद्धार्थ आणि कियारा एकत्र दिसले होते. तेव्हा सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली.2021 मध्ये कियाराच्या बर्थ-डे पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्पॉट झाला होता.

फिल्मी स्टाईलनं केलं प्रपोज

कियारानं काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये कियारानं तिच्या आणि सिद्धार्थच्या रोमच्या फॅमिली ट्रीपबाबत सांगितलं होतं. कोविडमुळे कियारासोबत तिचे कौटुंबिक या ट्रीपला येऊ शकले नव्हते. या ट्रीपच्या दरम्यान सिद्धार्थने एका रेस्टॉरंटमध्ये कँडल लाईट डिनरचा प्लॅन केला होता. तिथे काही लोक व्हायोलिन वाजवत होते. मग सिद्धार्थने गुडघ्यावर बसून कियारा प्रपोज केले. प्रपोज करताना सिद्धार्थ 'शेरशाह' चित्रपटामधील डायलॉग म्हणाला. "दिल्ली का सीधा-साधा लड़का हूं..." हा डायलॉग सिद्धार्थनं म्हणाल्यानंतर कियारा इंप्रेस झाली आणि तिनं सिद्धार्थला होकार दिला.

कॉफी विथ करण या शोमध्ये कियारानं हे देखील सांगितलं की, सिद्धार्थनं प्रपोज केल्यानंतर कियारानं करण जोहरला व्हिडीओ कॉल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com