
Sidharth & Kiara Wedding: बॉलीवूडमध्ये सध्या कोण-कोणाशी लग्न करतंय,कोण-कोणाला डेट करतंय यावरनं जोरदार चर्चा रंगलेली दिसून येतेय. यामध्येच एक नाव आहे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचे. या दोघांमध्ये सूत जुळलंय याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अर्थात दोघांनीही आतापर्यंत आपल्या नात्यावर भाष्य केलेलं नाही. मात्र दोघांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. यादरम्यान आता मीडिया रीपोर्ट्सनुसार समोर आले आहे ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाचं शहर आणि ठिकाण.(Sidharth Malhotra and kiara advani may get married soon looking for wedding venue in chandigardh)
एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्या महिनाभरापासून आपल्या लग्नासाठी योग्य असं ठिकाण शोधत होते. या कपलनं ज्या लक्झरी वेन्यूला संपर्क साधला आहे त्यापैकी एक आहे चंदीगढ मधील 'द ओबेरॉय सुखविलास स्पा अॅन्ड रिसॉर्ट'. हे तेच ठिकाण आहे जिथे राजकुमार राव त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत लग्नबंधनात अडकला होता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी गोव्यात देखील लग्नाचा वेन्यू पाहिल्याचं समोर आलं होतं. पण सिद्धार्थ मल्होत्रा पंजाबी कुटुंबातून असल्या कारणानं गोव्याचा प्लॅन ड्रॉप करण्यात आला आहे.
मनोरंजन सृष्टीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या बातम्यांना गेल्या काही दिवसांत ऊत आला होता. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शो मध्ये देखील दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सलमान खानच्या 'बिग बॉस सिझन १६' मध्ये पोहोचला होता. या दरम्यान सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छाही अॅडव्हान्समध्ये देऊन टाकलेल्या सगळ्यांनी पाहिल्या होत्या. तसंच, यावेळेला सलमान कियारा अडवाणीचा मुद्दामहून अनेकदा उल्लेख करताना दिसला.
सिद्धार्थ-कियाराच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर सिद्धार्थ सध्या 'थॅंक गॉड' मध्ये दिसला होता. आता पुन्हा सिद्धार्थ 'योद्धा' आणि 'मिशन मजनू' मध्ये काम करताना दिसणार आहे. तर कियारा अडवाणी 'जुग जुग जियो'मध्ये दिसली होती. आता कियारा अडवाणी 'गोविंद मेरा नाम' आणि 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात लवकरच दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.