Sai Tamhankar: असं काय घातलंय सईने की तेजस्विनी पंडीत म्हणाली,अबब! Mimi Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Tamhankar new photoshoot for magazine, Tejaswini Pandit Comment viral

Sai Tamhankar: असं काय घातलंय सईने की तेजस्विनी पंडीत म्हणाली,अबब!

Sai Tamhankar: सई ताम्हणकर हे नाव आता केवळ मराठी इंडस्ट्रीपुरतं मर्यादीत राहिलेलं नाही. बॉलीवूडमध्येही सई आता आपल्या अभिनयानं अन् त्याहीपेक्षा अधिक आपल्या ग्लॅमरस अंदाजानं भाव खाऊन जाताना दिसते. नुकताच तिनं तिच्या 'मिमी' सिनेमातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. पण त्यानंतर सईचा अंदाज एकदम बदललेला दिसतोय. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडच्या अभिनेत्रींना तगडी टक्कर देणारा सईचा एक लूक जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Sai Tamhankar new photoshoot for magzine, Tejaswini Pandit Comment viral)

हेही वाचा: The Kerala Story Teaser: 'केरळमधून कशा बेपत्ता झाल्या ३२,००० महिला? घटनेमागचं सत्य आता पडद्यावर...

सई ताम्हणकर सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती नेहमी सोशल मीडियावर आपलं हटके अंदाजातलं फोटोशूट शेअर करताना दिसते. आता नुकतंच तिनं सोशल मीडियावर एका मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी केलेलं फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यात सईनं ब्रा अन् पॅन्टी इतकेच कपडे अंगावर घातले आहेत. थोडक्यात सांगायचं तर टू पीस मध्ये सई दिसत आहे. अन् त्यात कर्व्ही फिगरमध्ये ती भलतीच हॉट दिसत आहे. असं नाही की सईनं याआधी कधी बिकनी घातलेली नाही पण तिनं तिच्या फिगरवर घेतलेल्या मेहनतीनं आताच्या टू पीसमध्ये ती पहिल्यापेक्षा अधिक आता उजवी दिसत आहे. सईची पोस्ट बातमीत जोडलेली आहे.

सईच्या या हॉट लूकवर मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात तेजस्विनी पंडीतनं केलेली कमेंट सध्या भलतीच चर्चेत आहे. तेजस्विनीनं सईच्या या हॉट लूकवर 'अबब...' म्हटलं आहे. स्वप्निल जोशी,प्रसाद ओक,प्रार्थना बेहरे यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा: Bhuvan Badaykar: एके काळी कच्चा बदाम म्हणत दारोदारी फिरणारा भुवन म्हणतोय,'आता मला शेंगदाणे विकायला..'

सई ताम्हणकर लवकरच मधुर भांडारकर दिग्दर्शित India Lockdown सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉंच करण्यात आलं. पण या पोस्टरवर ज्या लूकमध्ये सई दिसली तो लूक मात्र तिच्या चाहत्यांना खटकला आहे. अनेकांनी 'मराठी कलाकार नेहमीच मोलकरणीच्या भूमिका का करतात?'...असा सवाल अनेकांनी केला आहे.