Kiara Advani: वरुण धवनने परवानगीशिवाय कियारा अडवाणीला केलं कीस अन्…

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांमध्ये मध्यंतरी चांगलंच भांडण झाल्याचं मीडिया रीपोर्टनुसार सांगितलं जात आहे.
Sidharth Malhotra and Kiara Advani
Sidharth Malhotra and Kiara AdvaniSakal

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल आहेत. दोघांची केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही खूप आवडली आहे. ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून चाहतेही त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सध्या या जोडप्यामध्ये झालेल्या भांडणाची चर्चा होताना दिसत आहे. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांमध्ये मध्यंतरी चांगलंच भांडण झाल्याचं मीडिया रीपोर्टनुसार सांगितलं जात आहे. दरम्यान, एकदा वरुण धवनमुळे सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियारा अडवाणीवर चिडल्याची बातमी समोर आली आहे.

स्पॉटबॉयने एका रिपोर्टच्या आधारे सांगितले की वरुण धवनने एकदा कियाराला किस केले होते, ज्यामुळे सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या लव्ह लेडीवर खूप चिडला होता. खरतर असे घडले होते की 'जुग जुग जिओ'च्या प्रमोशनदरम्यान वरुण धवन आणि कियारा फोटोशूटसाठी पोज देत होते. दरम्यान, वरुण धवन अचानक कियारा अडवाणीच्या गालावर किस करतो, ज्यामुळे अभिनेत्री आश्चर्यचकीत होते. यादरम्यान एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Sidharth Malhotra and Kiara Advani
Nysa Devgn: अजय देवगणच्या लेकीचा सती सावित्री अवतार! नेटकरी थक्क म्हणाले,..

रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​वरुण धवनवर चिडला की दिग्दर्शकाच्या सूचनेशिवाय तो कियाराला कसे किस करू शकतो. वरुणमुळे सिद्धार्थही कियारावर चिडला होता. मात्र, नंतर हुशारीने वागून दोघांनीही आपलं नातं घट्ट करायचं ठरवलं.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन हळदीसाठी कुटुंबातील सदस्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन म्हणजेच हळदी, मेहेंदी आणि संगीताच्या तारखा पुढील महिन्यात 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी निश्चित केल्या आहेत. तसेच, 6 फेब्रुवारी 2023 रोजी सिड-कियारा लग्नबंधनात अडकू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com