
Sidharth Malhotra: केवढा लाजला! कियाराचं नाव घेताच सिध्दार्थच्या चेहराचं चमकला...
बॉलिवूडमध्ये सिध्दार्थ मल्होत्रा सध्या त्याचा नविन चित्रपट 'मिशन मजनू' मुळे खुप चर्चेत आहेच मात्र त्याच्या आणि कियाराच्या नात्यामुळेही तो चर्चेत आहे. सध्या तो चित्रपटाच्या सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान सिध्दार्थचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. यात जेव्हा सिध्दार्थ मल्होत्राला पापाराझींनी लग्नाबद्दल विचारलं तेव्हा तो एखाद्या मुलीसारखा लाजला.
सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्याच्या नात्याबद्दल अजुनही काही स्पष्ट केले नसले तरा त्याच्या नात्याबद्दल अनेक बातम्या समोर येतात. त्यांनी त्याच नातं स्वीकरलही नसलं तरी त्याला नकारही दिलेला नाही.
शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियाराची जवळीक वाढू लागली. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे आणि अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे. इतकेच नव्हेतर यावेळी न्यू इयर देखील दोघांनी सोबत सेलिब्रेशन केला.
दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांनाही आवडते, पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाही. तरीही या दोघांच्या लग्नाबद्दलची चर्चा होत आहे.तर आता पापाराझीने देखील लग्नाचं सिध्दार्थला विचारलं.
झालं असं की सिध्दार्थ मल्होत्राला पापाराझीने फोटो क्लिक करताना विचारले " भाई शादी कब है भाई शादी कब है 6 फेब्रुवारीला आहे का? यावर सिध्दार्थ म्हणतो सध्या तरी मिशन मजनूच आहे. मात्र त्यावेळी तो एखाद्या मुलीसारखा लाजतो आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसते. राजस्थानमधील रॉयल हॉटेल मध्ये या दोघांचा विवाह सोहळा होणार आहे अशी देखील चर्चा होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी ' अदल बदल ' आणि ' योध्दा ' या चित्रपटात दिसणार आहे.