शेरशाहनंतर 'योध्दा' चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा फर्स्ट लूक ; करण जोहरने केला फोटो शेअर : Sidharth Malhotra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Malhotra

योद्धामधील सिद्धार्थचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करताना करण जोहरने यावर प्रतीक्रिया व्यक्त केली आहे.

शेरशाहनंतर 'योध्दा' चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा फर्स्ट लूक

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

शेरशाह (Shershah) चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनात घर करणारा सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) पुन्हा एकदा योध्दा (Yodha movie) या चित्रपटातून झळकणार आहे. करण जोहरने (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन या ऑफिशियल ट्विटर वरून सिद्धार्थ मल्होत्राचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ मल्होत्रा ​​इंडस्ट्रीतील बड्या स्टार्समध्ये गणला जातो. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन सिद्धार्थने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सिद्धार्थची चित्रपटांची निवड आणि दमदार अभिनयामुळे तो चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.

योद्धामधील सिद्धार्थचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर करताना करण जोहरने यावर प्रतीक्रिया व्यक्त केली आहे. यात तो म्हणाला, धर्मा प्रॉडक्शनच्या पहिल्या अॅक्शन फ्रँचायझीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुन्हा एका दमदार शैलीत सादर करताना मला अभिमान वाटतो. याचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा ही डायनॅमिक जोडी करणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

योद्धामध्ये सिद्धार्थचा दमदार रोल

करण जोहरने ट्विटर वरून सिद्धार्थचा मोशन पोस्टर शेअर केला आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा रेस्क्यू ऑपरेशनच्या वेशभूषेत दिसत आहे. यो फोटोमध्ये सिद्धार्थ विमानात हातात बंदूक घेऊन फुल ऑन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. सिद्धार्थचा हा योद्धा लुक पाहून त्याची योध्दातील एंट्रीही दमदार असणार यात शंका नाही. सिद्धार्थनेही आपल्या सोशल अकाऊंटवरून याचा व्हिडिओ आणि फोटो शेअऱ केला आहे.

loading image
go to top