Sidharth Shukla Death Anniversary: 'शहनाज आलीच नाही!' चर्चेला उधाण|Sidharth prayer meeting arrange shehnaz gill absent | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Shukla Death Anniversary

Sidharth Shukla Death Anniversary: 'शहनाज आलीच नाही!' चर्चेला उधाण

Sidharth Shukla 1st Death Anniversary - सिद्धार्थच्या जाण्यानं त्याच्या लाखो फॅन्सला कमालीचं वाईट वाटलं होतं. त्याचं अकाली जाणं हे अनेकांसाठी (tv entertainment news) धक्कादायक होतं. बिग बॉस फेम या सेलिब्रेटीची सोशल मीडियावर मोठी क्रेझ होती. त्याचं व्यक्तिमत्व कमालीचं प्रभावी होतं. म्हणून की काय टीव्ही मनोरंजन विश्वातील कित्येक अभिनेत्री त्याच्या प्रेमात होत्या. (socia media viral news) शहनाज गिल देखील त्यापैकी एक. सिद्धार्थच्या मृत्युला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं त्याच्या कुटूंबियांनी एका श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र त्याला शहनाजची अनुपस्थिती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. शहनाज का नव्हती असा प्रश्न नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सिद्धार्थसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला सिद्धार्थचा हदयविकाच्या झटक्यानं निधन झाले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थचं अकाली जाणं हे त्याच्या चाहत्यांसाठी वेदनादायी होतं. त्याच्या जाण्याचा सगळ्यात मोठा धक्का शहनाज गिलला बसला होता. तिनं आठवडाभर अन्न, पाण्याचा त्याग केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अशावेळी सिद्धार्थच्या कुटूंबियांनी तिची समजूत घातली होती. मात्र आता सिद्धार्थच्या शोकसभेला शहनाज का नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिद्धार्थच्या आईनं काही दिवसांपूर्वी जन्माष्टमीच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात ब्रम्हाकुमारीच्या सदस्यांचा सहभाग दिसून आला होता. सिद्धार्थ हा ब्रम्हकुमारी परिवाराचा सदस्य़ होता. तो नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत होता. त्याच्या निधनानंतर त्या परिवारातील सदस्यांनी एका कार्यक्रमातून त्याला आदरांजली वाहिली आहे. जेव्हा सिद्धार्थचे निधन झाले तेव्हाच्या कार्यक्रमात शहनाज हजर होती. मात्र आताच्या कार्यक्रमातील तिची अनुपस्थिती ही अनेकांना खटकली आहे.

हेही वाचा: ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

सिद्धार्थ आणि त्याच्या आईचं विशेष नातं हे बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये दिसून आलं होतं. आई रिता हा जेव्हा त्याला भेटायला त्या शो मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांच्यातील चर्चा चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी होती. सिद्धार्थ हा आपल्या आईला जगातील सर्वाधिक खंबीर स्त्री असं म्हणायचा. त्यांच्यातील नातं हे चाहत्यांसाठी नेहमीच आदराचा आणि प्रेमाचा भाग होता.

हेही वाचा: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

Web Title: Sidharth Shukla Actor Prayer Meeting Arrange Mother Rita Shehnaz Gill Absent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..