esakal | 'ती अजूनही धक्क्यात'; सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजच्या वडिलांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

'ती अजूनही धक्क्यात'; सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजच्या वडिलांची प्रतिक्रिया

'ती अजूनही धक्क्यात'; सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजच्या वडिलांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे Sidharth Shukla हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या निधनावर संपूर्ण कलाविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धार्थची सर्वांत जवळची मैत्रीण शहनाज गिलला Shehnaaz Gill त्याच्या निधनाचे वृत्त कळताच तिने शूटिंग सोडलं. 'बिग बॉस'च्या घरात या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. "शहनाजला खूप मोठा धक्का बसला आहे. ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही", अशी प्रतिक्रिया तिचे वडील संतोख सिंग सुख यांनी 'ई टाइम्स'शी बोलताना दिली.

काय म्हणाले शहनाजचे वडील?

"शहनाज सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही. ती अजूनही धक्क्यात आहे. शहनाजचा भाऊ शाहबाज इथून निघाला आहे. तिच्यासोबत कोणीतरी राहावं म्हणून आम्ही शाहबाजला तिच्याकडे पाठवलंय. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त ऐकून आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे", असं ते म्हणाले.

सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. 'सिदनाज' असा हॅशटॅग या दोघांनी तयार केला होता. सिद्धार्थ-शहनाजच्या चाहत्यांमध्ये #sidnazz हा हॅशटॅग प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने शहनाजसोबत 'डान्स दिवाने ३' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शहनाजने सिद्धार्थसोबत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सिद्धार्थने यावेळी माधुरी दीक्षितसोबतही स्टेजवर डान्स केला होता.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. कूपर हॉस्पिटलने 'पीटीआय'ला याबद्दलची माहिती दिली. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

loading image
go to top