esakal | Sidharth Shukla Death: शवविच्छेदन पूर्ण; शरीरावर बाह्य किंवा अंतर्गत जखम नाही
sakal

बोलून बातमी शोधा

sidharth shukla

Sidharth Shukla Death: शवविच्छेदन पूर्ण; शरीरावर बाह्य किंवा अंतर्गत जखम नाही

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla मृतदेहाचे शवविच्छेदन गुरुवारी रात्री मुंबईतील कूपर रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सिद्धार्थच्या मृतदेहावर कोणतीही बाह्य किंवा अंतर्गत जखम आढळली नाही. तर व्हिसेरा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. शवविच्छेदन अहवालावरील मत डॉक्टरांनी राखून ठेवलं आहे. छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या यशस्वी मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी सिद्धार्थसारख्या कलाकाराचा अकाली ओढवलेला मृत्यू त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सहकलाकारांनाही चटका लावून जाणारा ठरला.

गुरुवारी सकाळी दहानंतर सिद्धार्थला जुहू इथल्या कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागलेला विलंब यामुळे सिद्धार्थच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सिद्धार्थ 'बिग बॉस'च्या तेराव्या पर्वाचा विजेता होता.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाचं निधन; नेटकऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली दाक्षिणात्य सिद्धार्थला

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

गुरुवारी पहाटे तीन- साडेतीन वाजताच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला जाग आली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखत असल्याचे त्याने आईला सांगितले. त्याच्या आईने त्याला प्यायला पाणी दिले आणि झोपण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर सिद्धार्थ सकाळी उठलाच नाही. आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आईने सिद्धार्थच्या बहिणीला फोन केला, आणि बहिणीने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली.

loading image
go to top