‘भावड्याची चावडी’त सिध्दार्थ जाधवची 'फुल टू धमाल'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 6 November 2020

या दिवाळी विशेष भागात सिद्धार्थने चावडीवर मजा-मस्ती तर केली आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना थक्कही केलं आहे.

 मुंबई - झी वाजवा या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपाचे प्रयोग सुरु केले आहेत. त्यांनी आता चावडीचं वातावरण तयार केलं असून  त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवा खजिना उपलब्ध झाला आहे.

आता ‘झी वाजवा’वरील ‘भावड्याची चावडी’ कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागात सिध्दार्थ जाधव उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत पार्थ भालेराव असणार आहे.  प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीवरील ‘भावड्याची चावडी’ या धमाल विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांचे  निखळ मनोरंजन होत आहे. चावडी ही अशी एक जागा आहे, जिथे कटिंग चहा घेत मित्र एकत्र जमतात आणि गप्पा मारतात. या गप्पांमधून त्यांच्यातील मैत्रीचे नाते अधिकच घट्ट होते. येत्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ‘भावड्याची चावडी’चा हा दिवाळी विशेष भाग प्रेक्षकांना बघता येणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@parthbhalerao @siddharth23oct #ZeeVajwa #ZeeVajwaKshannGajwa #BhavdyachiChavdi #SiddharthJadhav #ParthBhalerao

A post shared by Zee Vajwa (@zeevajwa) on

‘भावड्याची चावडी’च्या या आठवड्याच्या भागात दुहेरी धमाल होणार आहे; कारण मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ जाधव त्यात सहभागी होणार आहे. मिश्कील उत्तरे देण्याबद्दल सिध्दार्थ विख्यात असल्याने त्याच्या चित्रपटांप्रमाणेच या आठवड्यातील ‘चावडी’चा हा भागही ब्लॉकबस्टर असणार आहे. दर आठवड्याला प्रेक्षक आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे कलाकार या चावडीवरील धमालमस्तीचा आनंद घेतात.

 या दिवाळी विशेष भागात सिद्धार्थने चावडीवर मजा-मस्ती तर केली आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने  प्रेक्षकांना थक्कही केलं आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सिध्दार्थ म्हणाला भावड्याच्या चावडीवर येऊन आणि भावड्या व त्याच्या मित्रांशी मनसोक्त गप्पा मारून मला खूप मजा आली आणि मी या चावडीवर घालवलेला प्रत्येक क्षण खूप एन्जॉय केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidhartha jadhav perform in bhadyachi chavadi