Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या घरी 'बधाई हो' ! आई देणार गोड बातमी?

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवालाच्या (Sidhu Moosewala News ) कुटूंबियांकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.
 Sidhu Moosewala family welcome good news
Sidhu Moosewala family welcome good newsesakal

Sidhu Moosewala Punjabi singer : पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवालाची लोकप्रियता त्याच्या निधनानंतरही कायम आहे. आपल्या (Sidhu Moosewala Punjabi singer latest news) गाण्यांमधून नेहमीच वेगळा विचार मांडणाऱ्या सिद्धु मुसेवालाची २०२२ मध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती.

आता सिद्धु मुसेवालाच्या कुटूंबियांनी एक आनंदाची बातमी शेयर केली (Sidhu Moosewala Punjabi family Good News) आहे. त्यात सिद्धु मुसेवालाची आई चरणजीत या प्रेग्नंट असून त्यांच्या घरी आता नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

गायक आणि रॅपर म्हणून सिद्धू मुसेवालानं केवळ पंजाबच नाही तर देशात वेगळी ओळख तयार केली होती. त्याच्या गाण्यानं तरुणाईमध्ये मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले होते. शुभदीप सिंह उर्फ सिद्धु मुसेवाला (Sidhu Moosewala) याची मानसा मधील जवाहर गावात काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सिद्धु हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

सिद्धुच्या जाण्यानं त्याच्या कुटूंबियांवर मोठा आघात झाला होता. त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सिद्धुच्या हत्येला दोन वर्ष उलटुन गेली असली तरी त्याच्या नावाचा प्रभाव अद्याप कायम आहे. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आता पुन्हा सिद्धुच्या घरी गोड बातमी आल्यानं त्याच्या कुटूंबियांमध्ये तर आनंदाचे वातावरण आहे मात्र चाहत्यांनीही त्याच्या कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 Sidhu Moosewala family welcome good news
Pankaj Udhas Inspirational Story : शाहरुखला पहिला पगारसुद्धा पंकज उधास यांनीच दिला होता! गुजरातमधला जमीनदार असा बनला गझलसम्राट!

असं म्हटलं जातं की, मुसेवालानं २०२२ रोजी मानसा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान त्याची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी ३१ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली होती.

मुसेवालाची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याच्या गाण्यांमधील टार्गेट ऑडियन्स हा प्रामुख्यानं युथ असल्याचे सांगितले जाते. त्याच्या पंजाबी गाण्यांना मिळणारा प्रतिसादही प्रचंड आहे. सोशल मीडियावर त्याचा फॅनबेस मोठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com