Sidhu Mooswala Murder case: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाचा जेरबंद! अझरबैझानमधून अटक |Sidhu Mooswala murder case Sachin Bishnoi arrest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sidhu moosewala murder case

Sidhu Mooswala Murder case: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाचा जेरबंद! अझरबैझानमधून अटक

Sidhu Mooswala Murder case: पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्याकांडानं सारा देश हादरला होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्या प्रकरणाचा तातडीनं तपास व्हावा अशी मागणी सिद्धु मुसेवालाच्या चाहत्यानं केली होती. याप्रकरणात पोलिसांनी अझरबैझान मधून लॉरेन्स बिश्नोईच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे. मुसेवाला प्रकरणाचे धागेदोरे हे परदेशात सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सचिन असे बिश्नोईच्या भाच्याचे नाव असून तो या हत्याकांडाचा मास्टरमाईड असल्याचे बोलले जात आहे.

सिद्धुच्या प्रकरणात तपासयंत्रणा ही अधिक सक्रिय झाली आहे. त्यांनी वेगानं तपासाला सुरुवात केली आहे. यापूर्वी बिष्णोईची कसून चौकशी करण्यात आली होती. पुण्याशी सुद्धा या हत्येचे कनेक्शन आहे की काय यासंबंधीची एक बातमी दरम्यानच्या काळात व्हायरल झाली होती. खेडमधून एकाला अटकही करण्यात आली होती. सिद्धु मुसवाला प्रकरणानं काही दिवसांपासून वेगळं वळण घेतलं आहे. तपास यंत्रणेला प्रयत्नांची शर्थ करुन चौकशी करावी लागत आहे. लॉरेन्स बिष्णोईचा भाचा सचिन हा विदेशातून गँग ऑपरेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

तपासयंत्रणेला असा संशय आहे की, मुसेवालाची हत्या होणार याची माहिती सचिनला देखील होती. त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून कोणती माहिती समोर येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसेवाला हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्याविषयीच्या उलट सुलट प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मुसेवालाच्या हत्येनंतर प्रसिद्ध गायक बादशहा आणि मिका सिंग यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

हेही वाचा: 'महाराणीच म्हणायचं'! हुमाची 'रेड नोटीस'

पोलिसांनी असा दावा केला आहे की, सचिनच्या सांगण्यानुसार त्याचा मित्र संदीप उर्फ केकडानं सिद्धुची हत्या करण्यापूर्वी रेकी केली होती. सिद्धुला भेटण्यासाठी केकडा त्याचा फॅन म्हणून गेला होता. त्यानं त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि तो तिथेच बसून होता. त्या शो मधून बाहेर आल्यावर त्यानं शुटर्सला त्यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर शुटर्सनं फायरिंग करत मुसेवालावर गोळीबार केला होता.

हेही वाचा: Ram Setu Controversy: 'रामसेतू'चा वाद पेटला! काय आहे कारण?

Web Title: Sidhu Mooswala Murder Case Sachin Bishnoi Arrest Form Azerbaijan Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..