esakal | सिद्धार्थ गेल्याचं कळलं फॅन्सला आली चक्कर, केलं रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ गेल्याचं कळलं फॅन्सला आली चक्कर, केलं रुग्णालयात दाखल

सिद्धार्थ गेल्याचं कळलं फॅन्सला आली चक्कर, केलं रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला याच्या जाण्याचा धक्का मोठ्या प्रमाणावर त्याच्या चाहत्यांना बसला आहे. त्याचं काल हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. त्याच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आता सिद्धार्थच्या संदर्भात वेगवेगळया बातम्या पुढे यायल्या लागल्या आहेत. थोड्यावेळापूर्वी सोशल मीडियावर रश्मी देसाई ट्रेंड होती. त्याचे कारण म्हणजे तिला काही युझर्सनं ट्रोल केले होते. सिद्धार्थ आणि ती जेव्हा बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये एकत्र होते तेव्हा तिनं त्याच्याविषयी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. एका युझर्सनं ते विधान सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यानंतर सिद्धार्थच्या एका फॅन्सचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

सिद्धार्थचं निधन झालं. असं जेव्हा त्याच्या एका फॅन्सला समजले तेव्हा तिला तो धक्का सहन झालं नाही. आणि तिला चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. सिद्धार्थच्या कुटूंबाला त्याच्या जाण्यानं मोठा धक्का बसला आहे. वास्तविक सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांची जोडी सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. मनोरंजनाच्या क्षेत्रातही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद असल्याचेही दिसून आले आहे. सर्वांना हवाहवासा सिद्धार्थ अशा पद्धतीनं सर्वांचा निरोप घेईल हे कुणाला वाटले नव्हते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आपल्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं त्यानं लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग होता. त्यापैकी एक अशा फॅन्सला सिद्धार्थ जाण्याचा धक्का सहन झालेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचे डॉक्टर जयेश यांनी सांगितले की, जेव्हा सिद्धार्थच्या निधनाची बातमी त्याच्या एका फॅन्सला समजली तेव्हा तिला तो धक्का सहन झाला नाही. आणि ती बेशुद्धवस्थेत होती. डॉ.जयेश यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. यावेळी डॉ.जयेश यांनी सिद्धार्थ यांच्या परिवाराला सिद्धार्थच्या चाहत्यांशी बोलण्याचे आवाहन केलं आहे.

हेही वाचा: शहनाजला अश्रू अनावर; सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन

हेही वाचा: 'सिद्धार्थ खूप लवकर गेलास, तुझी नेहमीच आठवण येईल'

काल सिद्धार्थला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. डॉ.जयेश यांनी सांगितले आहे की, सिद्धार्थच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. तिला लवकर बरी होण्याचा सल्ला दिला आहे. त्याचे आणखी काही फॅन्सही मोठ्या धक्क्यात आहे. ते कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाही. मला असे वाटते की, चाहत्यांनी संयम ठेवण्याची गरज नाही. मला माहिती आहे की, हे फार सोपं नाही मात्र तुम्हाला तुमच्या डोक्यातून सिद्धार्थला काढून टाकावे लागेल.

loading image
go to top