
मुंबई - कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आले आहे. आरोग्य प्रशासनानं युध्दपातळीवर कोरोनाला सामोरं जाण्यासाठी तयारी केली आहे. मात्र नागरिक सावधगिरी बाळगत नसल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्येही मोठ्या संख्येने कोरोना पसरला आहे. आतापर्यत अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. चित्रिकरणाच्या वेळी कलाकारांना कोरोना झाल्यानं ते चित्रिकरण थांबवण्यात आले आहे. तसेच पूर्ण क्रु क्वारंनटाईन झाल्याची माहिती कोरोनाग्रस्त कलाकारांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. आता प्रसिध्द गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल यांना कोरोना झाला आहे. ते दोघेही क्वॉरनटाईन झाले आहेत.
आदित्य आणि श्वेता हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. गेल्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यावेळी काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता. चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी तेव्हा उपस्थिती लावली होती. त्यात प्रख्यात अभिनेता गोविंदा, भारती सिंह आणि हर्ष लिंबानिया यांचा समावेश होता. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती आदित्य आणि श्वेतानं सोशल मीडियावरुन दिली आहे. फॅन्सला ज्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे कळले तेव्हा त्यांनी आदित्य आणि श्वेताला काळजी घेण्यास सांगितलं आहे.
एक फोटो शेअर करुन आदित्य आणि श्वेतानं कोरोना झाल्याची माहिती शेअर केली आहे. आदित्यनं लिहिलं आहे की, तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार, मी आणि माझी पत्नी श्वेता अग्रवाल आमच्या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आम्ही दोघांनी क्वारंनटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सर्वांनी देखील काळजी घेणं आता खूप गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. अशा महत्वाच्या सुचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे आदित्य आणि श्वेता हे नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांचे नुकतेच लग्न झाले आहे. श्वेतानं तर आताच इंस्टा जॉईन केलं आहे. त्यावर तिनं आपल्या लग्नाचा एक फोटो शेअर केला होता. त्याला फॅन्सचा मोठा प्रतिसाद मिळाला. आदित्य आणि श्वेताची ओळख शापित नावाच्या चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.