esakal | चक्क, आशाताईंनी केला ऋतिकच्या गाण्यावर डान्स ...

बोलून बातमी शोधा

singer asha bhosle dance
चक्क, आशाताईंनी केला ऋतिकच्या गाण्यावर डान्स...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

सोशल मीडियावर आशाताई चर्चेत असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. त्यात आशाताईंनी चक्क ऋतिक रोशनच्या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या फॅन्सनं ज्यावेळी हा डान्स पाहिला तेव्हा ते चकितच झाले. यासाठी त्यांनी आशाताई यांना मनपूर्वक धन्यवाद दिले आहेत. त्यांच्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. सध्या आशाताई या 88 वर्षांच्या आहेत. मात्र या वयातही आपण किती कमालीचा डान्स करु शकतो हे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

ऋतिक रोशनच्या एक पल का जीना या गाण्यावर आशाताईंनी डान्स केला आहे. तो मोठ्या प्रमाणात लोकप्रियही झाला आहे. ऋतिकचे ते गाणे त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्या गाण्यात त्यानं केलेली स्टेप ही त्याची सिग्नेचर स्टेप झाली होती. आशाताई यांनीही ती स्टेप करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका युझर्सनं त्यावर कमेंट करताना लिहिले आहे की, मॅडम तुम्ही त्या गाण्यामध्ये खुप छान डान्स केला आहे. तुमचा उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.