esakal | प्रसिद्ध गायक कुमार सानु यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

kumar sanu

गायक कुमार सानू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुमार सानू त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला रवाना होणार होते.

प्रसिद्ध गायक कुमार सानु यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

kuमुंबई- कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कित्येक महिन्यांनतरही कोरोनाचा कहर कमी होताना दिसतंच नाहीये. बॉलीवूडमध्येही या व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नुकतंच गायक कुमार सानू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुमार सानू त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला रवाना होणार होते. मात्र त्या आधीच ते कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने आता त्यांना प्लानही रद्द झाला आहे.

हे ही वाचा: 'केदारनाथ'च्या पुन:प्रदर्शनावर चाहते नाराज, 'आणखी किती दिवस सुशांतला विकाल?' नेटकऱ्यांचा सवाल!

गायक कुमार सानू यांनी ही माहिती त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, 'दुर्दैवाने सानू दा कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.' कुमार सानू मुंबईत ज्या ठिकाणी राहतात त्या बिल्डिंगचा मजला बीएमसीने सील केला आहे. नुकतंच एका मिडिया हाऊससोबत बोलताना त्यांनी सांगितलं होतं की लॉकडाऊनमध्ये ते सतत काम करत होते. ९ महिन्यांपासून ते त्यांच्या कुटुंबियांना भेटले नव्हते. त्यांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लॉस एंजेलिसला जायचं होतं.

कुमार सानू यांनी सांगितलं होतं की, 'मी माझी पत्नी सलोनी, मुलगी शैनन आणि ऍनाबेलला भेटण्यासाठी उत्सुक आहे. फायनली २० ऑक्टोबरला त्यांच्यासोबत बर्थडे साजरा करेन.' तर कुमार सानू यांच्या पत्नीने सांगितलं की 'जर त्यांना बरं वाटलं तर ते ८ नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत येतील. सध्या ते क्वारंटाईन आहेत. ते आम्हाला भेटण्यासाठी ९ महिन्यांपासून वाट पाहत आहेत. ते म्हणाले जर ते अमेरिकेला येऊ शकले नाहीत तर येणारे सगळे सण साजरे करण्यासाठी त्यांचं पूर्ण कुटुंब मुंबईत येईल.' 

कुमार सानू यांचा मुलगा जान सानू सध्या 'बिग बॉस'च्या घरात आहे. या दरम्यान तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे करत असल्याने सध्या चर्चैत आहे.    

singer kumar sanu tested positive for covid 19