esakal | व्हॅक्सिन घेऊनही झाला कोरोना; गायक पलाश सेनची पोस्ट व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

singer palash sen the singer of dhoom covid positive after taking first dose of vaccine

प्रख्यात अशा युफोरिया बँडचे गायक आणि वादक पलाश सेन यांनी कोविडची पहिली लस घेतली.

व्हॅक्सिन घेऊनही झाला कोरोना; गायक पलाश सेनची पोस्ट व्हायरल 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सर्वांनाच एका वेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे रुग्णालयांमध्ये प्राथमिक सोयीसुविधा मिळत नसल्यानं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहून ल़ॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या प्रशासनापुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातही कोरोनानं शिरकाव केला आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्य़ा विळख्यात घेतलं आहे.

सध्या कोरोना झालेल्या अनेक सेलिब्रेटींनी क्वॉरंनटाईन करुन घेतलं आहे. काही जण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनही घेतलं आहे. मात्र असे काही सेलिब्रेटी आहेत की ज्यांनी लस घेऊनही त्यांना कोरोना झाला आहे. यापूर्वी एका अभिनेत्रींनं सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती. तिचं नाव नगमा. त्या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता प्रसिध्द गायक पलाश सेन यानेही सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, आपण कोरोनाची लस घेतली तरीही आपल्याला कोरोना झाला. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट लिहिल्या आहेत.

प्रख्यात अशा युफोरिया बँडचे गायक आणि वादक पलाश सेन यांनी कोविडची पहिली लस घेतली. त्यानंतर ते पुन्हा कोविड पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पलाशनं लिहिलं आहे की, सर्वांना नमस्कार, आज काही चांगली बातमी नाहीये. मात्र मी आता पुन्हा एक नवीन लढाई सुरु केली आहे. लस घेतल्यानंतरही मला कोरोना झाला आहे. मी घरात क्वॉरंनटाईन झालो आहे.  पलाशनं सांगितलं की, कोरोनातून बाहेर पडण्यासाठी मी योग्य ती काळजी घेत आहे. सध्या योगा, आयुर्वेद उपचारही सुरु आहेत. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना असे सांगु इच्छितो तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. आपआपली कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.

हेही वाचा : तैमुरचा योगा पाहिलात? करिनाने फोटो केला पोस्ट

55 वर्षीय गायक पलाश सेन हा डॉक्टरही आहे. त्यानं हिंदीत काही ओळीही लिहिल्या आहेत. त्यात तो म्हणतो, कोविड की मजाल देखो, डॉक्टर पे हमला,  कोई नहीं, बहुतों को फेस किया है, इसको भी कर लूंगा. अशा ओळी लिहून त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पलाशच्या पोस्टवर नेटीझन्सनं त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.