esakal | अखेर राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

rahul vaidya, disha parmar

अखेर राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बिग बॉस- 14 या शोमधून विशेष लोकप्रियता मिळवणारा गायक राहुल वैद्यने या शोमध्ये दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले होते. या शोमध्ये असल्यामुळे राहुल तिच्याशी संपर्कात नव्हता. त्यामुळे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी राहुलने शोच्या निर्मात्यांना त्याच्या भावना दिशापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होता. बिग बॉसच्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या स्पेशल एपिसोडमध्ये दिशाने बिग बॉसच्या घरात स्पेशल एन्ट्री केली. ही बहुचर्चित जोडी लग्नबंधनात कधी अडकणार, असे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात होते. अखेर राहुल-दिशाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. (singer rahul vaidya and disha parmar will tie the knot on this date)

एका मुलाखतीमध्ये राहुलने सांगितले, 'मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय मी आणि दिशाने घेतला आहे. आम्हाला असे वाटते की, आमच्या लग्नाला आमच्या प्रियजनांनी उपस्थित रहावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. या सोहळ्यामध्ये गुरबानी शाहाबाद देखील गायले जाणार आहे.' दिशाने तिच्या लग्नाबद्दल सांगितले, 'विवाह सोहळा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्न हे केवळ दोन लोकांचं नसून दोन कुटुंबांचं असतं. मला साध्या पद्धतीने पार पडलेला विवाह सोहळा आवडतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी माझा विवाह सोहळा साध्या पद्धतीने होत आहे.' येत्या १६ जुलै रोजी राहुल आणि दिशा लग्न करणार आहेत. राहुलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली.

हेही वाचा: दिशा पटानीच्या हॉट फोटोवर राहुल वैद्य फिदा; कमेंट करत म्हणाला..

हेही वाचा: काजोलच्या बहिणीने घेतला 'एग फ्रिजिंग'चा निर्णय; आता आई होण्याची चिंता नाही

राहुल आणि दिशाच्या 'मधाणीया' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या गाण्यामध्येही दोघांचं लग्न दाखवण्यात आलंय. बिग बॉस शोमध्ये असताना राहुलने या शोमधील स्पर्धकांना त्याच्या आणि दिशाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. बिग बॉस नंतर राहुल 'खतरों के खिलाडी' या शोच्या 11 सिझनमध्ये दिसणार आहे. दिशाने 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यार प्यार' आणि 'वो अपना सा' या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

loading image